Breaking

Local Body Elections : गडचिरोली ते बुलढाणा… भाजपकडून निवडणुकीची जोमाने तयारी!

Elections strategy discussed in BJP review meeting : अमरावतीच्या विदर्भ विभाग आढावा बैठकीत मंथन; रवींद्र चव्हाणांची उपस्थिती

Amravati पक्षाची संघटनात्मक रचना अधिक बळकट करण्यासाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील तयारीचे आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाची विदर्भ विभाग बैठक अमरावतीत झाली. या बैठकीला प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.

गडचिरोली ते बुलढाणा या विदर्भातील ३०९ मंडळे, १९ जिल्हे, ७ प्रदेश पदाधिकारी आणि अमरावती शहर व ग्रामीणचे सर्व प्रमुख पदाधिकारी या आढावा बैठकीला उपस्थित होते. चांद्यापासून बांद्यापर्यंत भारतीय जनता पक्ष अधिक सक्षम झाला असून त्यामागचे मुख्य कारण पक्षाची असलेल्या मजबूत संघटन शक्तीचे असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. हीच शक्ती अधिक बळकट करत संपूर्ण जिल्हा-मंडळ रचना लवकरात लवकर पूर्ण करावी. तसेच राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्ष अधिक सक्षम असावा, असं आवाहन त्यांनी केलं.

Bachhu Kadu Hunger Strike : तब्येत बिघडली, लेखी आश्वासनानंतर बच्चू कडूंचे आंदोलन थांबवण्यावर होणार ‘मंथन’

या बैठकीला प्रदेश महामंत्री माधवी नाईक, विदर्भ विभाग संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आमदार चैनसुख संचेती, आमदार प्रवीण तायडे, आमदार राजेश वानखडे, आमदार श्वेता महाले, भाजपा अमरावती शहर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे, जिल्हा ग्रामीण (मोर्शी) जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, जिल्हा ग्रामीण (मेळघाट) जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, सचिव जयंत डेहनकर, सरिता गाखरा, प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, संजय फांजे, किरण पातुरकर, किरण महल्ले, रवींद्र खांडेकर, प्रा. दिनेश सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.