Breaking

Local Body Elections : जिल्हा परिषद प्रभाग रचना; आक्षेपांवरील सुनावणी पूर्ण

Hearing on objections to Zilla Parishad ward structure completed : ११ ऑगस्टला निर्णय जाहीर होणार, फेररचनेमुळे समीकरण बदलणार

Akola जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रारूप प्रभाग रचनेविषयी प्राप्त आक्षेप व हरकतींवर विभागीय आयुक्त कार्यालयात दिनांक ५ ऑगस्ट रोजी सुनावणी पार पडली. एकूण ५२ सर्कलसाठी ३२ हरकती प्राप्त झाल्या होत्या. या सुनावणीचा निर्णय येत्या ११ ऑगस्ट रोजी जाहीर केला जाणार असून, त्याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळासह मतदारांचेही लक्ष लागले आहे.

६ मे २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात निर्णय दिल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर करत नागरिकांकडून आक्षेप व हरकती मागविल्या होत्या.

‘Chava Ride’ app : ‘छावा राईड’ ॲपद्वारे ओला – उबरला टक्कर

हे आक्षेप संबंधित तहसील कार्यालयांमध्ये सादर करण्यात आले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्यांची छाननी करून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला. त्यानुसार ५ ऑगस्ट रोजी आयुक्त कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. आता ११ ऑगस्ट रोजी आक्षेपांवरील निर्णय जाहीर होणार असून, त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी राज्य निवडणूक आयोग अंतिम मंजुरी (शिक्कामोर्तब) देणार आहे.

तालुकानिहाय दाखल आक्षेपांची संख्या

तालुका आक्षेपांची संख्या

पातूर २३
बाळापूर ०४
अकोला ०३
तेल्हारा ०१
अकोट ०१
बार्शी टाकळी ००
मूर्तिजापूर ००

प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर काही विद्यमान व माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या मूळ गावांचा नव्या सर्कलमध्ये समावेश झाल्याने त्यांच्या राजकीय संधींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही इच्छुक उमेदवारांनी यावर आक्षेप नोंदवले, मात्र अपेक्षित सुधारणा न झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे संभाव्य उमेदवारांमध्ये अस्वस्थता आणि अनिश्चितता वाढली आहे.

Ashish Jaiswal : गोगावले पालकमंत्री व्हावे, ही मागणी योग्यच !

राजकीय विश्लेषकांच्या मते, काही ठिकाणी फेररचना न झाल्याने विशिष्ट नेत्यांना लाभ होऊ शकतो, ज्याचा थेट परिणाम आगामी निवडणुकीच्या निकालांवर होऊ शकतो. त्यामुळे विभागीय आयुक्तांचा निर्णय राजकीय समीकरणांमध्ये कोणते बदल घडवतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.