Hundreds of Congress party workers join BJP : अमडापूरमध्ये जम्बो प्रवेश; महाविकास आघाडीला मोठा धक्का
Amdapur स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दृष्टिपथात असल्यामुळे आता पक्षांतराला चांगलाच उत आला आहे. अशात बुलढाणा जिल्ह्यातील अमडापूरमध्ये भाजपने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते भाजपत आल्यामुळे महायुतीसाठी हे चांगले लक्षण मानले जात आहे.
रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर अमडापूर परिसरात विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपात मोठ्या प्रमाणात प्रवेश झाला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, जिल्हाध्यक्ष विजयराजे शिंदे आणि लढवय्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामुळे परिसर भाजपमय झाला.
Sharap Pawar NCP : अवैध सावकारांना पोलिसांचे संरक्षण, राष्ट्रवादीचा आरोप
काँग्रेसचे विद्यमान तालुका कार्याध्यक्ष डॉ. विशाल देशमुख यांनी असंख्य सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केला. त्यांच्या नेतृत्वाखाली अनिल देशमुख, रवी देशमुख, योगेश भारसाकळे, घनश्याम जयस्वाल, गोपाल रगड, निलेश कौसे, आलियार खान, अक्षय माळोदे, पवन खंदलकर, गौरव देशमुख, तोफिक शेख, सलमान खान, समीर खान, तनवीर काजी, यादवराव शिंदे, अजय बीरंगळ, जमील काजी यांसह मोठा कार्यकर्ता वर्ग भाजपात सामील झाला.
Vidarbha Farmers : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या
आमदार श्वेता महाले पाटील यांच्या सततच्या जनसंपर्क, विकासाभिमुख धोरणे आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठीच्या लढ्यामुळेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपाकडे ओढा वाढत असल्याचे या प्रवेश सोहळ्यात बोलले गेले.