Election Commission starts preparations:निवडणुक आयोग लागला तयारीला
Mumbai: राज्यात लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबलेल्या निवडणुका घेण्याचा मार्ग न्यायालयाच्या निकालामुळे मोकळा झाला आहे त्या दृष्टीने निवडणूक आयोग कामाला लागला असून या निवडणुका साधारण वेगवेगळ्या टप्प्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेमुळे थांबवण्यात आल्या होत्या. त्या आता चार महिन्यांत घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ६ मे रोजी दिले. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. प्रशासकीय आणि राजकीय नियोजनानुसार वेगवेगळ्या टप्यांत निवडणूक घेण्याचे नियोजन होत असल्याची माहिती समोर येत आहे.
Rahul Narvekar : विस्तार होणार, पण विधानभवनाच्या ‘हेरिटेज लूक’ला धक्का नाही
राज्यातील २९ मनपा, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषद आणि २८८ पंचायत समित्यांसाठी ऑक्टोबर महिन्यात या निवडणुका होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. काही दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने सर्व महापालिका, जिल्हा परिषदांना एक पत्र पाठवले होते. त्यात ४० दिवसांत म्हणजे जूनअखेरपर्यंत वॉर्ड, प्रभाग तसेच गण, गट रचना करून घेण्याचे आदेश दिले होते.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी २०११ च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना होणार आहे. काही ठिकाणच्या रचनेत हद्दीत बदल होईल. त्याविरुद्ध लोक आक्षेप घेतील प्रसंगी न्यायालयात जातील. त्यामुळे प्रभाग रचनेसाठी दोन महिन्यांचा कालावधी लागेल असे नियोजन करण्यात आले आहे. एकूणच निवडणूक प्रक्रिया अंतिम करण्यासाठी तीन ते साडेतीन महिन्यांचा कालावधी लागेल. म्हणून ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.
R. R. Patil Sundar Gram Puraskar Scheme : आर.आर. पाटलांच्या नावाचा पुरस्कार सरकारने बंद केला?
एकाच टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी १ लाख ५० हजार ईव्हीएमची गरज भासणार आहे. मात्र, राज्य निवडणूक आयोगाकडे फक्त ६५ हजार ईव्हीएम आहेत. म्हणून ही निवडणूक वेगवेगळ्या टप्प्यात घेण्याची तयारी आयोग करत आहे. पहिल्या टप्प्यात उत्तर व दक्षिण महाराष्ट्रात मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा तर तिसऱ्या टप्प्यात, मुंबई, ठाणे आणि कोकणात मतदान व्हावे, असे नियोजन केले जात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या निवडणुका होत असल्यामुळे कार्यकर्ते आणि विविध पक्षांमध्ये वेगळीच लगबग पाहायला मिळत आहे.
#Local body elections #multiple phases #Election Commission st #preparations # Maharashtra state #state election commission #स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक #निवडणुक आयोग # राज्य निवडणूक आयोग #महाराष्ट्र शासन








