In the triangular contest, Shinde Sena and BJP are face-to-face : काँग्रेसचीही टक्कर जोरात, नगराध्यक्षपदाची खुर्ची कोणाकडे?
Buldhana बुलढाणा नगरपालिकेची निवडणूक यंदा प्रचंड रंगतदार ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. नगराध्यक्षपदासाठी ७ तर सदस्यपदासाठी १२४ उमेदवार रिंगणात असून, काँग्रेस–शिंदेसेना–भाजप यांच्यात खरी तिरंगी लढत रंगली आहे. तिन्ही पक्षांनी स्वबळावर मैदानात उतरत वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्व ताकद झोकली आहे.
या निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड, तसेच भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या प्रतिष्ठेची मोठी कसोटी लागली आहे. बुलढाण्यात नेमकी कोणाची पकड आणि वर्चस्व आहे याचा निर्णय ही निवडणूक करणार आहे.
राज्यात महायुतीत सत्ता असूनही बुलढाण्यात शिंदेसेना आणि भाजप एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. भाजपला रिपाइं (आठवले) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे समर्थन आहे. शिंदेसेना स्वबळावर लढत आहे. काँग्रेसने स्थानिक सहयोगींसह उमेदवार उभे केले आहेत. मात्र खरी लढत ही तिन्ही पक्षांतच आहे, असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे.
Vidarbha Farmers : तहसील कार्यालयाच्या छतावर स्वाभिमानींचे आंदोलन!
पतिपत्नींची थेट टक्कर
शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड – उमेदवार पत्नी पूजा गायकवाड
भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे – उमेदवार पत्नी अर्पिता शिंदे
काँग्रेसने भाजपचे माजी शहर नेते दत्ता काकस यांच्या पत्नी लक्ष्मी काकस यांना उमेदवारी
एका बाजूला तिन्ही पक्षांचे ‘महत्त्वाचे घराणे’, तर दुसरीकडे १ अपक्ष नगराध्यक्ष आणि १५ अपक्ष सदस्य रिंगणात आहेत. या अपक्षांचा मतविभाजनावर होणारा प्रभाव कोणाच्या पारड्यात जाते, यावर निकाल अवलंबून राहणार, अशी शहरात कुजबुज सुरू आहे.
तिन्ही पक्षांत काही नाराज कार्यकर्ते गुप्तपणे दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारास मदत करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. गुप्त बैठका, अंतर्गत नाराजी यामुळे मूळ पक्षांना प्रचारासोबतच स्वतःच्या घरातील असंतोष शमवण्याचे आव्हान आहे. तिकीट न मिळाल्यामुळे बाहेर पडलेले काही जण आता प्रतिस्पर्धी पक्षांच्या बाजूने प्रचार करत आहेत. अशा नाराजांच्या ‘उपद्रवमूल्या’मुळे तीनही पक्षाला ‘डॅमेज’ होण्याची शक्यता आहे.
Local Body Elections : विचित्र आघाड्या आणि २०० अपक्ष उमेदवार!
३० नोव्हेंबर रोजी प्रचार थांबणार असल्याने तिन्ही पक्ष प्रभागनिहाय कोपरा सभा, मोर्चे, रॅली, तसेच सोसायट्यांमधील ‘गठ्ठा मतां’वर जोर देत आहेत. हे गठ्ठा मते कोणाला साथ देतात, याचा थरार मतमोजणीच्या दिवशीच उलगडणार आहे.








