Breaking

Local Body Elections : प्रभाग रचनेत सत्ताधारी पक्षातील नेत्यांचा हस्तक्षेप

Interference of ruling party leaders in ward formation : महाविकास आघाडीचा आराेप; क्षेत्र रचनेत हस्तक्षेप थांबवण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Buldhana जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड व क्षेत्र रचनेची प्रक्रिया सुरू होत असताना, या प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप रोखण्याची जोरदार मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात आली. प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या अनुकूल निर्णय घेतल्याचे ठपके ठेवत, अशा कारभाराची तातडीने चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी, अशी ठाम भूमिका महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली.

महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बुलडाणा जिल्ह्यातील नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी वॉर्ड व क्षेत्र रचना ही पूर्णतः तांत्रिक निकषांवर आधारित, भौगोलिक सुसंगती व जनसंख्येच्या समानतेच्या तत्वावर होणे आवश्यक आहे. मात्र, सद्यस्थितीत सत्ताधारी पक्षाच्या सोयीसाठी रचना केली जात असल्याचा आरोप नागरिकांतून व राजकीय कार्यकर्त्यांतून होत आहे. अशा परिस्थितीत ही प्रक्रिया लोकशाही मूल्यांना बाधा पोहचवणारी ठरू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

Bacchu Kadu : काँग्रेस पदाधिकाऱ्यांची सत्ताधाऱ्यांशी छुपी युती

प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी महाविकास आघाडीचे विविध पक्ष व नेते एकत्र आले होते. यामध्ये आमदार सिद्धार्थ खरात, माजी आमदार राहुल बोंद्रे, काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. स्वाती वाकेकर, राष्ट्रवादीचे प्रसेनजित पाटील, शिवसेनेचे वसंतराव भोजने यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही उपस्थिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीने प्रशासनाला दिलेला स्पष्ट इशारा असल्याचे दिसून आले.

MLC Sandip Joshi : काँग्रेस विजयी झालेल्या पश्चिम आणि उत्तर नागपुरातही मतदार वाढले

“प्रशासनाने कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली न वागता, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवावी, अन्यथा जनतेचा सरकारवरील व निवडणूक यंत्रणेवरील विश्वास उडण्याची शक्यता आहे,” असे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता ही लोकशाहीचा गाभा असून, या प्रक्रियेत थोडीशीही पक्षपाती भूमिका उघड झाल्यास तिचा तीव्र राजकीय व सामाजिक परिणाम होईल, असा इशाराही महाविकास आघाडीने दिला आहे.