Local Body Elections : भाजप-शिंदेसेना शीतयुद्ध? निवडणुकांपूर्वी हालचालींना वेग!

Internal strife within the Mahayuti increased : महायुतीत अंतर्गत कलह कायम; बैठकांचे सत्र वाढले

Buldhana स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना महायुतीत अंतर्गत तणाव वाढल्याची चर्चा रंगू लागली आहे. भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या पट्ट्यात शिंदेसेनेचे नेते आ. संजय गायकवाड यांनी बैठकांचा धडाका लावताच, भाजपनेही गेल्या ३५ वर्षांपासून एकहाती तंबू रोवलेल्या मेहकर आणि लोणारमध्ये बैठकांचे आयोजन करून आगामी निवडणुकीचा बिगुल वाजवला. या हालचालींमुळे महायुतीतील मित्रपक्षांत शीतयुद्धाचे सावट तर नाही ना, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी लोणार आणि मेहकर या शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात संघटनात्मक बैठकींचे आयोजन केले. गेल्या तीन दशकांत या भागात भाजपला मजबूत नेतृत्व निर्माण करण्यात अपयश आले होते. त्यामुळे या पोकळीचा फायदा शिंदेसेनेला (पूर्वीची शिवसेना) मिळत आला होता. मात्र, भाजपच्या हालचाली लक्षात येताच शिंदेसेनेनेही मलकापूर, जळगाव जामोद, खामगाव आणि नुकतेच चिखली येथे बैठका घेऊन आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

Independence Day celebration : 15 सरपंचांना स्वातंत्र्यदिन उत्सवाचे निमंत्रण, 9 महिला सरपंचांचा समावेश

या घडामोडीत अजित पवार गटाच्या सक्रियतेमुळे रंगत वाढली आहे. भाजप-शिंदेसेनेतील मतांवर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. हिंदुत्ववादी मतांचा वाटा दोन्ही पक्षांत असल्याने सेक्युलर मतदार राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) बाजूने खेचण्याचा प्रयत्न होणार असल्याचे बोलले जात आहे.

Sajid Khan Pathan : आमदार पोहोचले बालभारतीच्या कार्यालयात!

नवीन भाजप जिल्हाध्यक्षांनी संघटनात्मक कामकाजावर भर देत शहरी व ग्रामीण भागात कार्यकारिण्या गठित करण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी शिंदेसेनेनेही बैठकींचा धडाका सुरू करून ताकद वाढविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.