Breaking

Local Body Elections : इच्छुकांची तलवार म्यान; भेटीगाठी थांबल्या!

 

Leaders stop meeting people as elections get delayed : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लांबणीवर गेल्याने हिरमोड

Gondia लोकसभा आणि विधानसभा निवडणुका मोठ्या नेत्यांच्या भवती फिरतात. पण ग्रामपंचायतपासून महापालिकेपर्यंत नशीब आजमावण्याची संधी स्थानिक नेत्यांना असते. अशात उन्हाळ्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, अशी आशा सर्वांना होती. त्यानुसार मोर्चेबांधणी देखील इच्छुकांनी सुरू केली होती. मात्र निवडणुका लांबणीवर गेल्यामुळे इच्छुक नेत्यांनी तलवारी म्यान केल्या आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्याने भावी नगरसेवकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे. नगर परिषदांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. एप्रिल ते मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता होती. पण आता निवडणुकीच्या तयारीसाठी केलेला खर्च आणि प्रचार यावर इच्छुकांनी तात्पुरता ब्रेक लावल्याचे दिसत आहे.

Local Body Elections : निर्णय लांबणीवर, इच्छुकांची वाढली चिंता!

विविध प्रभागांमध्ये जनसंपर्क वाढवणे, कार्यकर्त्यांचे स्नेहभोजन, उत्सवांमध्ये सहभाग आणि प्रचारासाठी होणारा खर्च आता काही काळ थांबवण्यात आला आहे. कार्यकर्त्यांशी संपर्क साधणे, सभा घेणे आणि विविध ठिकाणी भेटीगाठी करून आपला जनाधार मजबूत करण्यासाठी उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात तयारी केली होती. मात्र, निवडणुकीच्या अनिश्चिततेमुळे हे सर्व थांबले आहे. निवडणुका कधी होणार याचा अद्याप तरी काही मुहूर्त दिसत नाही. त्यामुळे उगाच खर्च करणे महागात पडत असल्याने इच्छुकही आता शांत बसले आहेत.

Local Body Elections : प्रशासकीय कारभाराने विकासकामांना खीळ!

नगरपरिषदांवर गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकराज आहे. यामुळेच सर्वांच्या नजरा निवडणुकीकडे लागून आहेत. निवडणुका केव्हा होतील आणि प्रचार पुन्हा कधी सुरू करायचा याबाबत सर्वच जण संभ्रमात आहेत. दरम्यान नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेतून होणार का याबाबत चर्चा रंगत आहेत. गेल्यावेळचा अनुभव लक्षात घेता नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून द्यावा लागणार आहे. सद्य:स्थितीत काहीही स्पष्ट नसल्याने इच्छुकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.