Breaking

Local Body Elections : निवडणुकीचा बार उडणार ऑक्टोबरमध्ये?

 

Local elections likely to be held before Diwali : दिवाळीपूर्वीच आटोपण्याची शक्यता; प्रभाग रचनेच्या घोषणेनंतर प्रक्रियेला गती

Akola राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने अधिकृत घोषणा केली नसली तरी राज्य शासनाने प्रभाग रचनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केल्यामुळे या निवडणुका ऑक्टोबर अखेरीस होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेच्या वेळापत्रकानुसार ११ जूनपासून सुरू झालेली प्रभाग रचनेची प्रक्रिया ४ सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल. त्यानंतर आरक्षण व मतदार यादीचे वेळापत्रक जाहीर होईल आणि सोबतच निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासकीय तयारी जोरात सुरू झाली असून, संबंधित जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. निवडणुकांमध्ये राज्यातील अनेक शहरांतील स्थानिक स्वराज्य संस्था सहभागी होणार आहेत. यामध्ये अकोला अमरावती सह नागपूर, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबादसह इतर महत्त्वाच्या महानगरपालिकांचा समावेश आहे. तसेच विविध जिल्ह्यांतील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या कार्यकाळाची मुदत पूर्ण होत आल्याने या निवडणुका घेतल्या जाणार आहेत.

Bacchu Kadu : बच्चू कडू म्हणाले, ‘बावनकुळेंकडून दमदाटीची भाषा’!

त्याच अनुषंगाने राज्यातील अ ब क ड महापालिका व नगरपरिषद आणि नगरपंचायतीचा प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. 10 जून रोजी राज्य शासनाने आदेश काढून प्रभाग रचनेबाबत सूचना दिली होती. आता कालावधी कार्यक्रम जाहीर केल्याने येत्या दोन महिन्यात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन निवडणुकीचा पुढील कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार ऑक्टोबर अखेरीस किंवा दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात उडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Raj Thackeray Meets Devendra Fadnavis : राज-फडणवीसांच्या भेटीने ‘मनोमिलन’ धोक्यात!

अकोला व अमरावती महानगरपालिकेच्या तसेच या दोन्ही जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना राजपत्रात एक सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मतदार यादी सुधारणा, प्रभाग रचना आणि महिला आरक्षण यासारख्या महत्त्वाच्या प्रक्रियांना अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. त्यानुसार लवकरच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.

Plane crash in Ahmedabad : 232 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान रहिवासी भागात कोसळलं!

उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर सुरू होईल. त्यानंतर छाननी, अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख, मतदान, मतमोजणी व निकाल जाहीर करण्याच्या तारखा आयोग जाहीर करणार आहे. राज्य निवडणूक आयुक्तांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकांना निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने आवश्यक नियोजन व समन्वय करण्याचे आदेश दिले आहेत.

Raj Thackeray meets Devendra Fadnavis : ‘त्यांचा इगो मोठा नाही, पण त्यांनी मौन साधलेय,’ नाव खराब होऊ शकतं!

राजकीय पक्षही आता निवडणूक तयारीला लागले आहे. संभाव्य उमेदवारांचा तपशील, प्रचाराची रणनीती, मतदारांशी संवाद वाढवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अनेक ठिकाणी संभाव्य उमेदवारांनी प्रभागांमध्ये भेटीगाठी वाढवल्या असून जनतेच्या गाऱ्हाण्यांवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते.