Mahavikas Aghadi to Contest Elections Unitedly : काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेची संयुक्त बैठक; जागा वाटपाचे सूत्र ठरणार
Akola जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र लढविण्याबाबत घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत झाले. निवडणुकीच्या रणनीतीसंदर्भात शासकीय विश्रामगृहात काँग्रेस, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या नेत्यांची संयुक्त बैठक पार पडली.
या बैठकीत निवडणुकीसंदर्भातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिवसेना उपनेते आमदार नितीन देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोकराव अमानकर, समन्वयक प्रकाश तायडे, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, मंगेश काळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे या बैठकीस उपस्थित होते.
Local Body Elections : दहा गटांतील मतदार ठरवणार जिल्हा परिषद महिला अध्यक्ष
बैठकीदरम्यान आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महापालिका निवडणुका आघाडीच्या पातळीवर एकत्र लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या संदर्भात सूक्ष्म नियोजन करण्यासाठी पुढील काळात आणखी एक बैठक घेण्याचे ठरविण्यात आले आहे.
MNS in Aghadi : आघाडीत सहभागी होण्यासाठी मनसेकडून प्रस्ताव नाही
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविताना प्रत्येक पक्षाने किती जागांवर उमेदवार द्यायचे, याचे सूत्र लवकरच ठरवले जाणार आहे. मात्र, निवडून येण्याची क्षमता आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव लक्षात घेऊनच उमेदवारांना प्राधान्याने संधी देण्याचे ठरले आहे.








