Local Body Elections : सर्कलनिहाय बैठकांचा सपाटा; जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाची पहिली कसोटी!

Mahayuti and Mahavikas Aghadi adopt a ‘wait and watch’ stance : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती-महाआघाडी ‘वेट अँड वॉच’ भूमिकेत

Washim स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात प्रमुख पक्षांनी सर्कलनिहाय बैठकींचा सपाटा सुरू केला आहे. भाजप, काँग्रेस, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या चारही पक्षांचे जिल्हाध्यक्ष पहिल्यांदाच थेट नेतृत्वाच्या कसोटीस सामोरे जाणार आहेत. त्यामुळे मतदारांचा कौल त्यांच्या नेतृत्वाला कितपत मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सध्या वाशिम, कारंजा, मंगरूळपीर, रिसोड या चार नगर परिषदा, मालेगाव नगरपंचायत तसेच जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समित्यांमध्ये प्रशासकिय कारभार सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या ५२ गट व पंचायत समित्यांच्या १०४ गणांचा अंतिम आराखडा विभागीय आयुक्तांनी मंजूर केला असून, आरक्षणाची घोषणा प्रलंबित आहे. नगरपरिषद व नगरपंचायत प्रारूप प्रभागरचनेवरील आक्षेपांवर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी झाली असून, त्यावर अंतिम निर्णयाची उत्सुकता आहे.

आगामी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने पक्षांतर्गत तणाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तिकीट कुणाला द्यायचे आणि कुणाला वेटिंगवर ठेवायचे, यावरून समीकरणे ढवळून निघतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महायुती होणार की महाविकास आघाडी टिकणार, याबाबत अजूनही स्पष्टता नाही.

Raut Vs Tumane : तुमानेंचा मोठा दावा आणि राऊतांचा पलटवार!

२०२० मधील जिल्हा परिषदेतील बलाबल

राष्ट्रवादी काँग्रेस – १४

काँग्रेस – ११

भाजप – ७

शिवसेना – ६

वंचित आघाडी – ६

जनविकास आघाडी – ६

स्वाभिमानी – १

अपक्ष – १

जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाची पहिली परीक्षा

काँग्रेस – आमदार अमित झनक
२०२१ मध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी विराजमान झालेले आमदार अमित झनक हे पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत. मागील पंचवार्षिकेत काँग्रेसचे १० सदस्य निवडून आले होते. हा आकडा टिकवून ठेवणे आणि त्यात वाढ करणे, हे त्यांच्यासमोरचे मोठे आव्हान आहे.

भाजप – पुरुषोत्तम चितलांगे
१४ मे २०२५ रोजी जिल्हाध्यक्षपद स्वीकारलेले पुरुषोत्तम चितलांगे यांच्यासाठीही ही पहिली मोठी परीक्षा आहे. भाजपला जिल्हा परिषदेवर कधीच सत्ता मिळाली नाही. त्यामुळे पक्षाला सत्तेच्या उंबरठ्यावर नेण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.

Chandrashekhar Bawankule : वडेट्टीवारांनी आम्हाला सांगावे, उपसमिती त्यावर निर्णय घेईल !

शिंदेसेना – महादेवराव ठाकरे, विजय खानझोडे
२०२३ पासून जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळणारे ठाकरे-खानझोडे जोडीला निवडणुकीत स्वतःची ताकद दाखवावी लागणार आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेला ६ जागा मिळाल्या, मात्र शिंदेसेनेला एकही सदस्य मिळाला नव्हता.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – बाबाराव पाटील खडसे
२०२३ पासून जिल्हाध्यक्ष असलेले खडसे हे देखील पहिल्यांदा निवडणूक लढविणाऱ्या स्थितीत आहेत. २०२० मध्ये राष्ट्रवादीचे १४ सदस्य निवडून आले होते, त्यापैकी ३ सदस्य पवार गटासोबत राहिले. पक्षाला उभारी देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.