Local Body Elections : निवडणुकीच्या रणांगणात महायुती सज्ज, नागपुरात झाली महत्त्वाची बैठक

Mahayuti ready for election battleground, important meeting held in Nagpur : रणनितीवर सविस्तर चर्चा ; तालुका ते ग्रामपातळीवर निवडणूक यंत्रणा मजबूत करण्यावर भर

Nagpur : आगामी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील महायुती आणि समविचारी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) कार्यालय, गणेशपेठ येथे पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीसाठीच्या राजकीय रणनिती, उमेदवार निवड प्रक्रिया, आणि संघटनात्मक बळकटीकरणावर सविस्तर चर्चा झाली.

बैठकीला आमदार कृपाल तुमाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा निरीक्षक राजेंद्र जैन, प्रदेश महासचिव तानाजी वनवे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे, भाजपा जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप इटकेलवार, तसेच नागपूर पंचायत समितीचे माजी सभापती अजय बोढारे, विनोद सातंगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनिल अहिरकर, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, विशाल खांडेकर, बजरंग परिहार आणि भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष चेतन खडसे आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

Amul mitkari : प्रवक्तेपदावरून हटवलेले अमोल मिटकरी आता राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक!

महायुतीचा एकसंघ मोर्चा..
या बैठकीत सर्वच नेत्यांनी “नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुका या जनतेच्या विश्वासावर लढवायच्या आहेत” असा निर्धार व्यक्त केला. महायुतीचे घटक पक्ष भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन प्रत्येक नगरपंचायत व नगरपरिषद क्षेत्रात एकसंध लढा देण्याची रणनीती आखली आहे. पक्षांतर्गत समन्वय वाढवणे, कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणे आणि स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका घेणे, या तीन मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. “स्थानिक स्वराज्य संस्था या विकासाच्या केंद्रबिंदू आहेत; त्यामुळे जनतेच्या हिताच्या मुद्यांवर महायुती एकदिलाने उभी राहील,” असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.

Ajit Pawar : ‘वर्षा’ बैठकीत अजित पवार संतप्त, सरकारमधून बाहेर पडण्याचीही भाषा !

राजकीय तापमान वाढले..
या बैठकीनंतर जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाले आहे. “आता खऱ्या अर्थाने नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीचा ज्वर चढू लागला आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक कार्यकर्त्यांनी दिली. राजकीय निरीक्षकांच्या मते, या बैठकीनंतर महायुतीने ग्राम ते शहर पातळीवर संघटन मजबूत करण्याची मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक तालुक्यात समन्वय समित्या तयार करून उमेदवार निवड आणि प्रचार नियोजनावर भर दिला जाणार आहे.

Local Body Elections : भाजपला रोखण्यासाठी शरद पवार गटाची जोरदार तयारी !

जनतेच्या मुद्द्यांवर लक्ष..
बैठकीत पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि करप्रणालीतील पारदर्शकता या स्थानिक मुद्यांवर जनतेशी थेट संपर्क साधण्याचे ठरले. महायुतीचे उद्दिष्ट केवळ सत्ताप्राप्ती नव्हे, तर स्थिर आणि विकासाभिमुख स्थानिक प्रशासन निर्माण करणे आहे, असे सर्वच नेत्यांनी एकमुखाने नमूद केले.
या बैठकीनंतर नागपूर जिल्ह्यातील महायुतीचा राजकीय पाय अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे. आगामी निवडणुकांत भाजप–राष्ट्रवादी–शिवसेना युतीने निर्णायक लढा देण्याचे संकेत स्पष्टपणे दिसत आहेत.