Major Setback for Shiv Sena (Shinde Group) in Akola : तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवणारे विजय मालोकार पुन्हा काँग्रेसमध्ये
Akola अकोल्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यातील प्रमुख नेते विजय मालोकार यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली असून शासनाच्या विविध समित्यांवरही त्यांनी काम केले आहे.
विजय मालोकार यांच्यासोबतच शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे सहसंपर्क प्रमुख आणि हिंगोली जिल्ह्यातील नेते डॉ. रमेश शिंदे पाटील तसेच त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पार पडला.
Opponents counterattack : मेमनची फाशी रद्द करा म्हणणारांच्या मतदारसंघातील यादी तपासा !
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस, युवासेना, भाजप आणि शेतकरी संघटनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करताना सांगितले की, “गेल्या काही दिवसांत राज्यभर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर नेते व कार्यकर्त्यांचा ओघ वाढत आहे. गडचिरोली, जालना आणि नांदेडनंतर आता अकोल्यातही पक्ष प्रवेशाची लाट दिसून येत आहे. लवकरच आणखी काही महत्त्वाचे नेते काँग्रेसमध्ये येणार आहेत.”
Farmers’ struggle : बच्चू कडुंवरच उलटला त्यांचा ‘प्रहार’, शेतकऱ्यांचा विश्र्वासघात की रणनितीचा विजय?
विजय मालोकार यांच्या राजकीय प्रवासाचा विचार केला तर त्यांनी शिवसेना, मनसे, भाजप आणि शिंदे गट अशा अनेक पक्षांतून काम केले आहे. १९९९ मध्ये त्यांनी प्रथम विधानसभा निवडणूक लढवली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर ते अकोला जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. शिवसेना सत्तेत असताना त्यांना एसटी महामंडळावर पद मिळाले होते.
मात्र, स्थानिक नेत्यांसोबत झालेल्या मतभेदांनंतर त्यांनी शिंदे गटाला रामराम ठोकत हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पक्षांतर शिंदे गटासाठी अडचणीचे ठरू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.








