MLA Praveen Datke faces the challenge of capturing Nagpur district : दोन माजी जिल्हाध्यक्ष देणार तगडी साथ
Nagpur : नागपूर जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने संघटनात्मक तयारी सुरू केली आहे. मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांच्यावर शहरासह संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या मदतीसाठी दोन माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजीव पोतदार आणि अरविंद गजभिये यांची नेमणूक करण्यात आली आहे. आमदार प्रवीण दाटके यांच्या नेतृत्वात भाजप जिल्ह्यात ‘स्थानिक’च्या निवडणुकांमध्ये सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.
गेल्या निवडणुकीत काँग्रेसने माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद आणि अनेक नगरपालिकांवर झेंडा फडकवला होता. त्यावेळी भाजपला ग्रामीण भागात अपेक्षित यश मिळाले नव्हते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. नागपूर जिल्ह्यात उमरेड वगळता सर्व ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे संघटनात्मक दृष्ट्या पक्षाची ताकद वाढलेली आहे. असे असले तरी नागपूर ग्रामीण मध्ये काँग्रेसचा प्रभाव अद्याप कमी झालेला नाही. सुनील केदार यांचा अजूनही दबदबा आहे. त्यातच रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे हे सुद्धा जोमाने तयारीला लागलेले आहेत. काँग्रेसची ही जोडी ग्रामीण भागात चांगलीच प्रभावी मानण्यात येते. या निवडणुकीत ग्रामीणमध्ये काँग्रेस भाजपला चांगलीच टक्कर देणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे झटके यांच्यासमोर जिल्हा काबीज करण्याचे मोठे आव्हान आहे.
Pune land scam: १ टक्के शेअरधारकावर गुन्हा, मग पार्थ पवारांवर का नाही?
राज्यातील सध्याच्या राजकीय वातावरणात शेतकऱ्यांमध्ये सरकार विषयी कमालीची नाराजी आहे. त्याचा फटका ग्रामीणमध्ये भाजपला बसणार असा काँग्रेसचा दावा आहे. अतिवृष्टी, अपुरी नुकसान भरपाई, कर्जमाफी, हमीभावाचा प्रश्न या कारणांनी ग्रामीण भागातील मतदार संतप्त आहेत. दरम्यान प्रवीण दटके हे संघटन शक्ती, जातीची समीकरणे आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी समन्वय साधण्यात पारंगत मानले जातात. मध्य नागपूर मतदारसंघतून मोठ्या मताधिक्याने ते निवडून आलेले आहेत. आमदार दटके यांच्या या कौशल्याचा फायदा भाजपला या निवडणुकांमध्ये करून घ्यायचा आहे. त्यामुळे पक्षाने त्यांना शहरासह ग्रामीणची जबाबदारी देऊन वेगळी रणनीती आखलेली आहे.








