Nagpur Municipal Corporation elections, a stage that will determine the political future of many : आरक्षण निश्र्चितीनंतर स्पष्ट होणार चित्र
Nagpur : नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला आहे. निवडणुकीसंदर्भातील आरक्षणाचा प्रस्ताव प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. यानंतर इच्छुक उमेदवार आणि सर्वसामान्य नागरिकांकडून हरकती व सुचना नोंदवण्यासाठी आठवडाभराचा कालावधी देण्यात आला आहे. या सर्व प्रक्रियेनंतर ११ नोव्हेंबरला सोडत काढण्यात येणार आहे. नेमका कोणता प्रभाग खुला आणि कोणता राखीव, याची उत्सुकता सध्या नागपूरच्या राजकीय वर्तुळात कमालिची वाढली आहे.
प्रभागांचे आरक्षण निश्र्चित करण्यासाठी प्रशासनाकडून पारदर्शक पद्धतीने कार्यवाही करण्यात येत आहे. सोडतीची प्रक्रिया अनुसूचित जाती, अनुसिचित जमाती प्रवर्गाच्या मतदारसंघांपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर उतरत्या क्रमाने इतर प्रवर्गांसाठी राखीव जागा निश्र्चित करण्यात येतील. त्यामुळे कोणत्या प्रभागातून कोणाला संधी मिळणार आणि कोणत्या प्रभागाचा दर्जा खुला राहणार, याबाबत सध्या राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आले आहे.
Winter session : हिवाळी अधिवेशन आणि विदर्भ : हुरडा पार्ट्या, पर्यंटनाच्या प्रतिमेतून गांभीर्याकडे !
राजकीय पक्षांसह संभाव्य उमेदवारांनी आपआपल्या गणितांची मांडणी सुरू केली आहे. मागील निवडणुकीतील आरक्षणातील बदलांमुळे अनेक संभाव्य उमेदवारांनी यावेळी नवीन प्रभागांत तयारी सुरू केली आहे. त्यामुळे ११ नोव्हेंबरची तारीख ही केवळ औपचारिक सोडत नाही, तर अनेक नेत्यांच्या राजकीय भवितव्याची दिशा ठरवणारा टप्पा ठरणार आहे. प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार, नागरिकांना हरकती आणि सुचना देण्यासाठी सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.
Vijay Malokar : मालोकारांचा काँग्रेस प्रवेश अकोल्यातील पदाधिकाऱ्यांना रुचला नाही
सात दिवसांच्या कालावधीत नागरिक किंवा राजकीय पक्षांना आरक्षणासंदर्भात आक्षेप असल्यास ते सादर करता येतील. यानंतर अंतिम आरक्षण यादी जाहीर केली जाईल. सोडतीनंतर निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नागपूर महानगरपालिका निवडणुकीकडे केवळ राजकीय पक्षांचेच नव्हे, तर सर्वसामान्य मतदारांचेही लक्ष लागले आहे. प्रभागांचे नवे आरक्षण निश्र्चित झाल्यानंतर शहरातील निवडणूक रंगमंचावर कोणाची एंट्री होणार आणि कोणाची जागा राखीव ठरणार, हे स्पष्ट होणार आहे.








