Breaking

Local Body Elections : शिंदे गटाचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का

NCP district president joins Shiv Sena : महिला नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश; जिल्हाध्यक्षांचा समावेश

Buldhana आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय समीकरणात मोठा बदल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (आजित पवार गट)च्या महिला नेतृत्वाने थेट शिवसेना शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला आहे. मुंबईतील शिवसेना पक्ष कार्यालयात उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अनुजाताई सावळे, महिला आघाडीच्या सरचिटणीस सरलाताई बाहेकर तसेच उबाठा गटाच्या महिला आघाडी प्रमुख जिजाबाई राठोड यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. यांच्यासह बुलढाणा लोकसभा क्षेत्रातील जयकुमार सरकटे, अरुण अंभोरे, दीपाली वाचोळ, दीपाली पवार, विश्रांती जाधव, विजय राठोड, संगीता पवार, दीपाली वायचोळ आदी कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

Shiv Sena Eknath Shinde : स्थानिक निवडणुका गायकवाड यांच्या नेतृत्वात?

या प्रवेशामुळे जिल्ह्यातील महिला नेतृत्वाची ताकद शिंदे गटात जमा झाली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदा निवडणुकीत शिवसेनेला संघटनात्मक बळ मिळण्याची शक्यता आहे. या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला झटका बसला आहे. शिंदे गटाने महिला आघाडीतूनही जिल्ह्यात उगम घेण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Maharashtra BJP : ‘कमळ’ सोबत घेतल्याशिवाय घरातून बाहेर पडू नका!

महायुतीमधील अंतर्गत पक्षांतर सुरूच
महायुतीमधील मित्र पक्षांमध्ये अंतर्गत पक्षांतर सुरूच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. विशेषतः शिवसेनेतून राष्ट्रवादीत आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेत जाणाऱ्यांचीच संख्या जास्त आहे, असे दिसते. यामध्ये भाजप तटस्थ भूमिकेत आहे. मात्र, स्थानिक निवडणुकांमध्ये या एकूणच बदलांचा फटका राष्ट्रवादी आणि शिवसेनेलाच बसणार असे दिसत आहे.