Breaking

Local Body Elections : अकोला जिल्ह्यात ५३१ सरपंचपदांची नव्याने आरक्षण सोडत

 

New reservation for 531 sarpanch posts in Akola district : ९ जुलै रोजी तहसीलस्तरावर होणार आरक्षण प्रक्रिया

Akola सन २०२५ ते २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या अकोला जिल्ह्यातील ५३१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण ९ जुलै रोजी निश्चित करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया तालुकास्तरावर सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. त्यासाठीचे अधिकृत पत्र जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जारी केले आहे.

यापूर्वी दिनांक ६ मे रोजी सरपंचपद आरक्षण प्रक्रिया पार पडली होती. मात्र, ग्रामविकास विभागाने ती रद्द करत १३ जून रोजी नव्याने आरक्षण निश्चित करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार ९ जुलै रोजी नव्या आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ या वर्षअखेर संपुष्टात येत असल्याने निवडणूक पूर्वतयारीसाठी ही आरक्षण प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. यामध्ये एकूण २६७ ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

MLA Sanjay Khodke : ‘उडता अमरावती’ होण्यापासून वाचवा, आमदारांची सभागृहात हाक

आरक्षण सोडतीचे ठिकाण:

अकोला: डीबीए हॉल, तहसील कार्यालय
तेल्हारा: तहसील कार्यालय
आकोट: तहसील सभागृह, पोपटखेड रोड
बाळापूर: नगरपरिषद सभागृह
पातूर: तहसील कार्यालय नवीन हॉल
मुर्तिजापूर: धान्य गोदाम क्र. ५, एसडीओ कार्यालय
बार्शीटाकळी: पंचायत समिती कार्यालय

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : नागपूर होतेय कॅन्सरची राजधानी, प्रवीण दटकेंनी सांगितले वास्तव !

प्रवर्गनिहाय आरक्षण तपशील:

प्रवर्ग संख्या

अनुसूचित जाती १२७
अनुसूचित जाती (महिला) ६६
अनुसूचित जमाती ४६
अनुसूचित जमाती (महिला) २४
नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) १४३
मागास प्रवर्ग (महिला) ७३
खुला प्रवर्ग २१५
खुला प्रवर्ग (महिला) १०४

नवीन आरक्षण सोडतीनंतर पुढील निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाला दिशा मिळणार असून, संभाव्य उमेदवार आणि ग्रामपंचायतींसाठी ही प्रक्रिया निर्णायक ठरणार आहे.