Local Body Elections : ‘स्थानिक’ निवडणुकांबाबत काय म्हणतात महायुतीचे नेते ?

Opinions of BJP leaders Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule and NCP leader Praful Patel : काही ठिकाणी स्थानिक समीकरणांनुसार लढती होणार

Mumbai : येत्या तीन ते साडेतीन महिन्यांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट सामना होणार असल्याचे चित्र सध्यातरी आहे. आम्ही महायुती म्हणून लढू, असे नेते सांगत असले तरी काही ठिकाणी स्थानिक समीकरणांनुसार लढती होणार आहेत. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात. विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी नेत्यांप्रति असलेले कर्तव्य बजावले. आता नेत्यांची जबाबदारी आहे की, कार्यकर्त्यांना बळ द्यावे. त्यामुळे सर्व नेतेही तयारीला लागलेले आहेत आणि बैठकांचा सपाटा सुरू केला आहे. यासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारणा केली असता, राज्यातील सर्व निवडणुका आम्ही एकत्र महायुती म्हणून लढणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

Bacchu Kadu Strike : शरद पवारांचा फोन, मनोज जरांगेची भेट, अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस

निवडणुका लढण्याबाबतचे आदेश आम्ही कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. आमचे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची याबाबत त्यांच्या स्तरावर चर्चा सुरू आहे. पण एखाद्या ठिकाणी जागेवरून जर वाद झाला तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल. इतर ठिकाणी महायुती म्हणून निवडणुका लढल्या जातील, असे बावनकुळे म्हणाले.

CM Devendra Fadnavis : 2 हजार 588 कोटी 55 लाख रू. निधीतून विकासकामे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही एकत्र लढणार आहोत. शक्य असेल तेथे युती केलीच जाईल. पण जेथे शक्य नाही, अशा ठिकाणी आम्ही स्वबळावर लढू. यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच तयारीला लागले पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते प्रफुल पटेल म्हणाले. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दिला आहे. फडणवीस म्हणाले, आमची भूमिका पक्की आहे. आम्ही महायुती म्हणूनच निवडणुका लढणार आहोत.