Panna Pramukh will play important role in elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी खास नियोजन
Akola elections लोकसभेतील अपयशानंतर विधानसभेत मतदारांनी महायुतीला Mahayuti भरभरून मतदान केले. यात लाडकी बहीण सारख्या योजनेचा महायुतीला फायदा झाला. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी सरकारच्या योजना घरोघरी पोहोचण्यासाठी भाजपने पन्ना प्रमुखांवर भर दिल आहे. त्यासाठी बैठकांचे सत्र अकोला जिल्ह्यात सुरू आहे.
सरकारी योजनेचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेची माहिती घेऊन भाजप सदस्य नोंदणी अभियानाला गती देण्यात येईल. यासाठी ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात येत आहे. या माध्यमातून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी बैठक आयोजित करण्यात येत आहे. प्रत्येक गाव, शहर पातळीवर या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न भाजप पदाधिकारी करीत आहेत.
BJP Congress Nagpur Zilla Parishad : भाजप-काँग्रेसचे ‘हम साथ साथ है’!
सर्वाधिक सभासद करण्याचा संकल्प करुन कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. यासंदर्भातील आवाहन भाजप प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर यांनी केले. भाजप कार्यालयात अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात, तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासाचा झंझावात सुरू आहे. ग्रामीण आणि शहरी भागाचा समतोल विकास करण्यात येत आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम सुरू आहे. लाडकी बहीण, वेगवेगळ्या समाजासाठी महामंडळ, वेगवेगळ्या योजना सुरू करून सामाजिक उत्थान करण्याचं काम महायुतीने केले आहे. याचा लाभ घेऊन आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका राहील, असे ते म्हणाले.
BJP Congress Nagpur Zilla Parishad : भाजप-काँग्रेसचे ‘हम साथ साथ है’!
सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविण्यावर भर देण्यात यावा, असे आवाहन खासदार अनुप धोत्रे यांनी केले. या बैठकीला जिल्हा ग्रामीण अध्यक्ष किशोर पाटील, देवेंद्र देवर ,जयंत मसने विजय अग्रवाल, दादाराव पेठे, विजयसिंह सोळंके अंबादास उमाळे माधव मानकर, अनिल गावंडे दिगंबर गावंडे, राजेश ठाकरे, हिम्मत देशमुख पंकज वाडीवाले, राजेश बेले, शंकरराव वाकोडे, तेजराव थोरात, विनय भटकर, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विशेष भर..
बैठकीत विकास कामावर चर्चा चर्चा करण्यात आली. मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी अभियान राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी खासदार अनुप धोत्रे यांच्या सक्रियतेचे कौतुक करण्यात आले. शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विशेष भर देऊन काम करण्याचे आम्हालाही कार्यकर्त्यांना करण्यात आले.