Breaking

Local Body Elections : कोणत्या पक्षाचे वर्चस्व कुठे? नव्या रचनेचा फायदा कुणाला?

Political calculations will be decided on the new ward structure : राजकीय गणितांवर होणार परिणाम; जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या रचनेकडे लक्ष

Buldhana राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची प्रभाग रचना पारदर्शक व कायदेशीर चौकटीत होण्यासाठी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला.

या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार, उपविभागीय अधिकारी शरद पाटील आदी उपस्थित होते.

Dadaji Bhuse : विद्यार्थ्यांकडून साफसफाईची कामं; शिक्षणमंत्र्यांच्या कार्यक्रमावरून पेटलं राजकारण

बुलढाणा जिल्ह्यात ६१ जिल्हा परिषद आणि १२२ पंचायत समिती प्रभागांचे पुन्हा निर्धारण होणार आहे. या रचनेचा थेट परिणाम स्थानिक राजकारणाच्या गणितांवर होणार आहे. कोणत्या पक्षाचे वर्चस्व कुठे राहणार, कोणाला नव्या रचनेचा फायदा होणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

MLA Siddharth Kharat : शेतकऱ्यांना त्रास दिलात तर गाठ माझ्याशी; आमदारांचा महावितरणला इशारा

महत्वाच्या तारखा:

प्रारूप अधिसूचना प्रसिद्धी : १४ जुलै २०२५
हरकती/सूचना स्वीकारण्याची अंतिम मुदत : २१ जुलै २०२५
विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर : २८ जुलै २०२५
सुनावणी व अंतिम निर्णय : ११ ऑगस्ट २०२५
अंतिम प्रभाग रचना आयोगाकडे सादर : १८ ऑगस्ट २०२५
प्रक्रियेतील पारदर्शकता राखत सर्व पक्षांना समान संधी देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांनुसार कारवाई होणार असल्याचे डवले यांनी स्पष्ट केले. प्रभाग रचनेचा हा कालावधी सर्वच राजकीय पक्षांसाठी निर्णायक ठरणार आहे. आगामी निवडणुकांची दिशा व परिणामकारकता या नव्या प्रभाग रचनेवरच अवलंबून राहणार आहे.