Political conflict escalated in Akola district : पक्षांतर्गत संघर्ष आणि बंडखोरीला सुरुवात; बैठकांमधून राजकीय मंथन
Akola अकोला जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तणावपूर्ण बनले आहे. पक्षांतर्गत वाद, बंडखोरी आणि आघाड्यांमधील मतभेदांमुळे निवडणूक तयारीवर मोठा परिणाम होत आहे.
भारतीय जनता पक्षाने (भाजप) अकोला जिल्ह्यातील ११ पदाधिकाऱ्यांना पक्षविरोधी कारवायांमुळे सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. या कारवाईमुळे पक्षातील अंतर्गत कलह उफाळून आला आहे. त्याचप्रमाणे, शिवसेना (शिंदे गट) मध्ये चार जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीवरून वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी पसरली असून, त्यामुळे पक्षांतर्गत फूट अधिकच तीव्र झाली आहे.
Operation Prahar : अकोला पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रहार’; अवैधतेचा अंत, प्रहाराचा प्रारंभ
अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये महायुती (भाजप, शिवसेना – शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) आणि महाविकास आघाडी (काँग्रेस, शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट) यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. मात्र, जागावाटप व उमेदवार निवडीत अद्याप स्पष्टता नसल्याने राजकीय अनिश्चितता वाढली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अकोला जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत होणार आहेत. सध्या अकोला महापालिकेत प्रशासक राजवट लागू आहे. २०१७ मध्ये येथे ८० सदस्यांची निवड झाली होती, तर यंदाच्या निवडणुकीत ९१ सदस्यांची निवड होण्याची शक्यता आहे.
MLA Sajid Khan Pathan : अकोल्यात अवकाळी पावसाचे थैमान, जनजीवन विस्कळीत
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०२२ पूर्वीची आरक्षणाची स्थिती कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत, त्यामुळे अनेक राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी अकोला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबई पाठोपाठ अकोल्यातही आढावा बैठकीतून राजकीय मंथन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शरद पवार गटाकडून आढावा घेण्यात आला. वंचित बहुजन आघाडीने पक्ष संघटना नव्याने बांधणी करून आगामी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. या सर्व पक्षांच्या पुढे एक पाऊल टाकत भाजपने निवडणुकीची तयारी केली असून, पक्षांतर्गत यावर खलबते सुरू आहेत. या तयारीत काँग्रेस मात्र माघारताना दिसत आहे.