Politics to Heat Up Over Seat Distribution Among Political Parties : महाविकास आघाडीची १९ ऑक्टोबरला समन्वय बैठक; महायुतीची दिवाळीनंतर रणनिती ठरणार
Buldhana जिल्हा परिषद आणि पालिकांच्या आरक्षणाचे त्रांगडे अखेर सुटले असले तरी आता राजकीय रणांगणावर “जागा वाटप” हेच नवीन समीकरण ठरणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पॅनेलसमोर अंतर्गत मतभेद आणि जागा फॉर्म्युल्यावर एकमत साधणे ही मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकीकडे भाजपने दिवाळीनंतर महायुतीची समन्वय बैठक घेण्याचा निर्णय घेतला असून, दुसरीकडे महाविकास आघाडीने १९ ऑक्टोबर रोजी बुलढाण्यात राष्ट्रवादी भवनात बैठक बोलावली आहे. या बैठकीस माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची उपस्थिती निश्चित झाली असून, कोअर आणि समन्वय समित्यांमार्फत जागा वाटपाचा आराखडा तयार होणार आहे.
Local Body Elections : सिंदखेड राजा नगरपरिषद मतदारयादीत गोंधळाचा भडका!
पालिका व जिल्हा परिषदेतील आरक्षणामुळे अनेक दिग्गजांच्या गोटात धांदल उडाली आहे. काही ठिकाणी आरक्षण सर्वसाधारण, तर काही ठिकाणी महिलांसाठी निघाल्याने स्थानिक स्तरावरील समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
भाजपने आरक्षणाचा अभ्यास पूर्ण केल्याचे सांगितले जात असले तरी “स्वबळावर लढायचे की युतीत?” हा प्रश्न महायुतीसमोर कायम आहे.
२०१६-१७ मधील पक्षीय बलाबल (संक्षेप)
संस्था भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना
जि.प. सदस्य 11 03 06 –
पं.स. सदस्य 15 18 22 11
पालिका सदस्य 87 25 45 17
या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ८३% पालिका सदस्य, ९२% जिल्हा परिषद सदस्य आणि ८९% पंचायत समिती सदस्य हे महायुती वा महाविकास आघाडीतीलच आहेत, त्यामुळे जागा वाटपाच्या चर्चेत संघर्ष होणे स्वाभाविक आहे.
महाविकास आघाडीतील प्रमुख तिन्ही पक्ष — काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) — यांच्या प्रमुख नेत्यांची १९ ऑक्टोबरला बुलढाण्यात बैठक होणार आहे. या बैठकीनंतर जागा वाटपासाठी समन्वय समिती गठित केली जाणार आहे.
भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या पक्षांच्या कोअर समित्यांमार्फत जागा वाटपावर निर्णय घेतला जाणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि इतर वरिष्ठ नेते दिवाळीनंतर एकत्र येऊन आराखडा ठरवतील.
Swabhimani Shetkari Sanghatna : तर गाठ आमच्याशी आहे, ‘स्वाभिमानी’चा सरकारला इशारा
आरक्षण निश्चित झाल्याने आता निवडणूक प्रक्रियेची चाके फिरू लागली आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील ‘समन्वय की संघर्ष’ हे समीकरणच आगामी निवडणुकीतील राजकीय तापमान ठरवणार आहे.








