Local Body Elections : आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला!

Prestige of Present and Former MLAs at Stake : चिखली नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप-काँग्रेसमध्ये थेट लढत

Chikhali चिखली नगरपालिकेची आगामी निवडणूक ही भाजप नेत्या आमदार श्वेता महाले आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. दोन्ही नेत्यांनी पक्षशक्ती आणि संघटनबल दाखविण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. अद्याप निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली नसली तरी भाजपकडून उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

दिवाळी सुट्टीदरम्यान भाजपच्या नगराध्यक्ष पदासाठी तब्बल २८ अर्ज प्राप्त झाले आहेत. यासाठी कोअर कमिटीने नगराध्यक्ष आणि नगरसेवक इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. या बैठकीस आमदार श्वेता महाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधर महाले, तसेच प्रकाश बुवा जवंजाळ, सतीश गुप्ता, विजय कोठारी, डॉ. प्रतापसिंग राजपूत, राजेश खरात, प्रेमराज भाला आणि रामकृष्ण शेटे उपस्थित होते. मुलाखतींसाठी इच्छुकांची मोठी गर्दी दिसली.

Local Body Elections : मेहकर नगरपरिषद मतदार यादीत मृतांची नावे कायम!

नगराध्यक्ष पदासाठी भाजपमधील चार प्रमुख दावेदारांचे नाव पुढे आले आहे:
माजी नगराध्यक्ष सुहास शेटे
माजी शहराध्यक्ष पंडितराव देशमुख
व्यापारी अशोक अग्रवाल
माजी नगरसेवक रामदास देव्हडे
शहरात डॉ. संध्या कोठारी यांचे नावही चर्चेत असून, बाहेरील एखाद्या प्रभावी व्यक्तीचे नाव अंतिम यादीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. २८ नगरसेवक पदांसाठी तब्बल ११० अर्जदारांनी मुलाखती दिल्या आहेत. इच्छुक सोशल मीडियासह दीपावलीच्या निमित्ताने जनसंपर्क मोहिमा राबवत आहेत.

इतर पक्षही सज्ज!
शिंदेसेनेकडून विलास घोलप नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे शंतनू बोंद्रे यांनी स्वतंत्र लढण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि उद्धवसेना आघाडी करण्याच्या तयारीत आहेत. निवडणुकीची घोषणा होताच चिखलीतील राजकीय रंगत अधिकच वाढण्याची शक्यता आहे.

काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी प्राचार्य नीलेश गावंडे, कुणाल बोंद्रे, दीपक देशमाने, सचिन बोंद्रे, आणि राहुल सवडतकर ही नावे चर्चेत आहेत. सर्वच इच्छुक शहरातील नागरिकांशी थेट संवाद साधत असून, मतदारसंघात सक्रिय हालचाली सुरू आहेत.

Eknath Shinde Shivsena : शिंदेसेना यंदा ‘घाटाखाली’ जोर मारणार का?

चिखली नगरपालिकेतील ही निवडणूक केवळ नगरराजकारणापुरती मर्यादित न राहता, भाजप आणि काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनली आहे. आगामी काही दिवसांत या निवडणुकीची रंगत संपूर्ण जिल्ह्यात जाणवणार, हे निश्चित आहे.