Local Body Elections : ग्रामीण भागात निवडणुकीचा बिगुल

 

Reservation of Sarpanch post announced : सरपंच पदाच्या आरक्षणासाठी सोडत जाहीर

Buldhana जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी तारीख निश्चित करण्यात आली आहे. १६ एप्रिल रोजी तहसील स्तरावर, तर २५ एप्रिल रोजी जिल्हास्तरावर महिला आरक्षणासाठी सोडत काढण्यात येणार आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ३० आणि मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ अंतर्गत, २०२५ ते २०३० या कालावधीत सरपंच पदासाठी आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया १६ एप्रिल रोजी तहसील स्तरावर होणार आहे. निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार हे आरक्षण निश्चित करणार आहेत.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागास प्रवर्गातील महिला आणि खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी २५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आरक्षण सोडत काढली जाणार आहे. सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

Local Body Elections : प्रशासक काळात तिसरे बजेट!

निवडणुकीसाठी प्रतीक्षा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विषय अद्याप निकाली लागलेला नाही. न्यायावयातील सुनावणीवर सारेकाही अवलंबून आहे. विधानसभा निवडणूक झाल्यावर दोन महिन्यांत या निवडणुका होतील, असे बोलले जात होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दोनवेळा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आता उन्हाळ्याच्या सुट्यांनंतरच सुनावणी होईल. त्यामुळे आता निवडणुका दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीनंतरच होतील, असे चित्र आहे.

प्रशासन लागले कामाला
सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत असो किंवा मतदार याद्या अपडेट करणे असो. प्रशासनाची धावपळ निवडणुकीच्या तयारीसाठीच चालली आहे, हे स्पष्ट आहे.