Local Body Elections : कोण निवडून येणार? सोशल मीडियावरच रंगतेय आकडेमोड

Result Predictions are being made on social media : नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी लावले जात आहेत अंदाज

Malkapur मलकापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या सार्वत्रिक निवडणुका २ डिसेंबर रोजी पार पडल्या. नगराध्यक्ष पदासाठी १० तर २८ नगरसेवक पदांसाठी तब्बल १२९ उमेदवार रिंगणात होते. सर्वांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सीलबंद झाले आहे. मात्र निवडणुकीच्या निकालाची तारीख लांबल्याने शहरात नवनवीन चर्चांना उधाण आले आहे.

दररोज सोशल मीडियावर विविध पक्षांचे कार्यकर्ते आपापली आकडेमोड मांडत आहेत. काही जण स्वतःचा विजय निश्चित असल्याचे सांगत तर काही प्रतिस्पर्ध्यांचा पराभव कसा होईल याचे अंदाज मांडत असल्याने शहरात एकप्रकारचे ‘राजकीय मनोरंजन’ सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Dr. Shashikant Khedekar : रब्बी हंगामावर संकट, सिंचनासाठी तातडीने पाणी सोडा

निकाल १८ दिवस लांबला; उत्सुकता ताणली

या निवडणुकीत ४२,६९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून ७४.०४% इतका मतदानाचा टक्का नोंदवला गेला. निवडणूक आयोगाने निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर होणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे निकाल २१ डिसेंबर पर्यंत लांबणीवर गेला. त्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांच्या उत्सुकतेचा तापमानदर वाढला आहे.

पक्षनिहाय ‘सिट’ कशी निघणार?

निकाल लांबल्याने गेल्या सहा दिवसांत सोशल मीडियावर खालील मुद्द्यांवर चर्चा रंगताना दिसत आहे—

भाजपची सिट कशी निघेल?

काँग्रेस किती मतांची आघाडी घेणार?

राष्ट्रवादी (अ.प.) ने किती कडा लढत दिली?

नगराध्यक्ष पदावर शिंदे गट, राष्ट्रवादी (श. प.), अपक्ष यांचे काय समीकरण?

२८ नगरसेवक पदांच्या प्रभागांमध्ये कोणाचा कोणाशी सामना झाला?

कोणाला किती मते मिळू शकतात?

प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने मतांची बेरीज-जुळवाजुळव करत आहेत आणि तीच आकडेवारी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Digital Fraud : ‘हॅलो, मी नाशिक पोलिस स्टेशनमधून बोलतोय’… एका फोनवर दोन कोटी उकळले

गल्लोगल्ल चर्चांना तापमान

निकालासाठीचा १८ दिवसांचा कालावधी असल्याने शहरातील चौक, चहाचे टपरी, कार्यालये आणि सोशल मीडियावर दररोज निवडणुकीची चर्चा तापली आहे.
“नगराध्यक्ष कोण?”
“कोणत्या प्रभागातून कोण पुढे?”
“कोणता पक्ष किती नगरसेवक जिंकणार?”
अशा प्रश्नांनी शहरात राजकीय रंगत चांगलीच वाढली आहे.