Local Body Elections : रस्सीखेच, बंडखोरी अन् सस्पेन्स पॉलिटिक्स!

Suspense politics in the Khamgaon Municipal Council election : महिला आरक्षणामुळे ‘सौं’पेक्षा ‘साहेब’ अधिक सक्रिय!

Khamgao आगामी नगरपरिषद निवडणुकीत खामगावमध्ये राजकीय तापमान चांगलेच चढले असून, प्रमुख पक्षांनी महायुती-महाविकास आघाडीची बंधने झुगारून स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू केल्यामुळे राजकीय समीकरणे अनिश्‍चिततेत अडकली आहेत. इच्छुकांची लांबलचक रांग, पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरीची शक्यता पाहता *‘सस्पेन्स पॉलिटिक्स’*चा अवलंब करण्याशिवाय पर्याय नाही—अशीच स्थिती भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) व काँग्रेसमध्ये पाहायला मिळत आहे.

भाजपकडून ‘वेट अँड वॉच’; उमेदवारी जाहीर करण्यात विलंब जाणूनबुजून?

राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सर्वच पक्षांत मुलाखत सत्रांना मोठी गर्दी पाहायला मिळाली. मात्र, भाजपने अद्याप उमेदवारांची अधिकृत घोषणा न करण्यामागे एकच प्रमुख कारण सांगितले जाते. अनेकांची नावे चर्चेत असूनही अंतिम निर्णय पुढे ढकलल्याने स्थानिक राजकारणात ‘भाजपचा पुढचा पाऊल काय?’ हा प्रश्न अधिकच गहिरा झाला आहे.

Anil Deshmukh : सत्तेसाठी नैतिकता गहाण ठेवणाऱ्यांना पवार साहेबांवर बोलण्याचा अधिकार नाही !

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सध्या शांत मोडमध्ये आहे. महायुतीसोबत की स्वतंत्रपणे—याबाबत स्पष्ट भूमिका अजूनतरी दिसत नाही. त्यामुळे त्यांची ‘वेट अँड वॉच’ पॉलिसी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

जिल्हास्तरावर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला साथीला घेतले असून, नगराध्यक्ष पदाचा संभाव्य उमेदवारही काँग्रेसकडून जवळपास ‘फिक्स’ झाल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीचे एकत्रित सूत्र जमल्यास हा उमेदवार अंतिम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

महिला आरक्षणामुळे अनेक प्रभागांत उमेदवार महिला असल्या तरी संपूर्ण राजकीय मोहीम पतीकेंद्रित होताना दिसत आहे. घराघरांत भेटीगाठी, मते मागणे आणि रणनीती आखणे—हे सर्व पतीच करत असल्याची चर्चा शहरभर आहे. तथापि, पक्षाने अंतिम हिरवा कंदील न दाखवल्याने इच्छुकांमध्ये संभ्रमाचे वातावरण कायम आहे.

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उद्धव गट) यांना सामावून घेण्याबाबत अद्याप स्पष्टता नाही. महायुतीत भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार गट) स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे २ दिवस उरले असल्याने सर्वच इच्छुकांची धडधड वाढली आहे.

Local Body Elections : चिखली निवडणुकीत ‘संपूर्ण सस्पेन्स’, बंडखोरी अटळ, राजकीय वातावरण तापलं

भाजपच्या बैठकीत बंडखोरीचा धोका टाळण्यासाठी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार फुंडकर परिवारातूनच देण्यावर सहमती झाल्याची चर्चा जोरात आहे. पक्षश्रेष्ठींची मंजुरी मिळताच अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी माहिती भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली. १५ नोव्हेंबरपर्यंत एकूण ८ अर्ज दाखल झाले असून, शनिवारी अपक्षांनी मोठ्या संख्येने अर्ज भरत नगर परिषद कार्यालयात गर्दी केली.