The atmosphere heated up with the politics in Buldhana : महाविकास आघाडीची मंद गती; निवडणुकांपूर्वी सावध भूमिका
Buldhana आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्याच्या राजकारणात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. शिंदे गट व उद्धव ठाकरे गटात शह-काटशहाचं युद्ध रंगू लागलं असून, भारतीय जनता पक्षाची पडद्याआड चालही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
११ जुलै रोजी उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी बुलढाणा दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कोणताही जाहीर मेळावा न घेता निवडक पदाधिकाऱ्यांशीच त्यांनी संवाद साधल्याने स्थानिक रणनीतीबाबत अनेक तर्क-वितर्क रंगू लागले आहेत. त्यानंतर काही तासांतच शिंदेसेनेचे राष्ट्रीय सचिव व जिल्हा निरीक्षक कॅ. अभिजित अडसूळ यांनी देखील ‘मातोश्री जनसंपर्क कार्यालयात’ बैठका घेऊन आपला शक्तिप्रदर्शनाचा इशारा दिला.
Buldhana Panchayat Samiti : रोकडिया नगर शहरात, पण तालुक्याचे गण गेले कुठे?
मनसे व उद्धव ठाकरे गटाचे नेते एका मंचावर येण्याच्या हालचालींनी शिंदेसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषतः हिंदी भाषेच्या मुद्द्यावर मनसे-उद्धवसेनेचे मतैक्य भाजपला आणि शिंदे गटाला त्रासदायक ठरू शकते, अशी चर्चा आहे. या सर्व घडामोडींमध्ये भाजपने मात्र ठाम मौन राखले असून, आंतरिक डावपेच आखण्यावर त्यांचा भर असल्याचं बोललं जातं.
जून २०२२ मध्ये शिवसेनेचं दोन गटांत विघटन झाल्यानंतर ही पहिलीच मोठी स्थानिक निवडणूक असणार आहे. २०१६-१७ मध्ये एकसंघ शिवसेनेने जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पालिका मिळून तब्बल ८६ जागांवर वर्चस्व गाजवलं होतं. मात्र आता दोन्ही गटांची खरी ताकद हाच निवडणूक परिणाम स्पष्ट करणार आहे.
Grampanchayat Swdat : लोकांनीच मतदान करून सरपंचाला केले पायउतार!
या सगळ्या राजकीय धुमश्चक्रीत महाविकास आघाडीची हालचाल तुलनेत धीमी आहे. १४ जुलै रोजी सिंदखेडराजा येथे होणाऱ्या मोर्चावर त्यांचं लक्ष केंद्रित असल्याचे दिसते. काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात उद्धवसेना आणि मनसे यांच्यातील वाढती जवळीक खदखद निर्माण करत आहे. त्यामुळे आघाडीतील एकसंधतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.