The equation of caste and women’s reservation will be decisive in Nagpur Municipal Corporation : नव्याने मांडली जाणार राजकीय गणिते
Nagpur : नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीची तारीख अखेर निश्र्चित झाली आहे. येत्या ११ नोव्हेंबरला आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर शहराच्या राजकीय रणभूमीवर उमेदवारांच्या चर्चांना आणि गाठीभेटींना वेग येणार आहे. मनपाच्या निवडणुकीसाठीची ही प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. आरक्षणानंतरच अनेक इच्छुकांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.
महानगरपालिकेच्या एकूण १५१ वॉर्डांमध्ये यंदा १२ जागा अनुसूचित जातींसाठी, चार जागा अनुसूचित जमातींसाठी आणि ३५ जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच एकूण २० जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. या आरक्षण प्रक्रियेमुळे शहरातील प्रत्येक प्रभागातील राजकीय गणितं नव्याने मांडली जाणार आहेत. अनेक प्रभागांत उमेदवार बदलावे लागण्याची शक्यता राजकीय पक्षांकडून व्यक्त केली जात आहे.
Municipal Corporation : गडकरींच्या फटकारणीनंतर मनपाची धावपळ, आयुक्तांनी कचरा कंपन्यांना दौडवले !
प्रभागनिहाय आरक्षणाचा मसुदा तयार झाल्यानंतर नागरिक आणि राजकीय पक्षांकडून हरकती व सुचना नोंदवण्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत पक्षनिहाय प्रतिनिधी, माजी नगरसेवक आणि स्थानिक नागरिक आपल्या सुचनांच्या माध्यमातून प्रभागांचे आरक्षण बदलण्याची मागणी करू शकतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१७ च्या आरक्षण योजनेप्रमाणे बव्हंशी प्रभागांमध्ये आरक्षण कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र काही प्रभागांत पुरूष आणि महिला आरक्षणात अदलाबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यामुळे काहींची राजकीय गणिते पूर्णपणे बदलण्याचीही शक्यता आहे.
Local Body Elections : भीलगाव सर्कलमध्ये काँग्रेस – भाजप आमने – सामने !
याच वेळी महापौरपदाचे आरक्षणाही निश्र्चित होणार आहे. कोणत्या प्रवर्गासाठी हे पद राखीव ठेवले जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील वेळी हे पद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. त्यामुळे यंदा पुरूष प्रवर्गासाठी आरक्षणाची शक्यता नाकारता येणार नाही. राजकीय विश्र्लेषकांच्या मते आरक्षण सोडतीनंतर नागपूरच्या राजकारणात उमेदवारांची धावपळ आणि पक्षांतराचे सत्र पुन्हा सुरू होईल. अनेक संभाव्य उमेवार आधीपासूनच आपल्या प्रभाागांच्या आकडेमोडीवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे ११ नोव्हेंबर हा दिवस नागपूर महानगरपालिकेच्या राजकारणाची दिशा ठरवणार असणार आहे.








