Local Body Elections : चाचपणी अंतिम टप्प्यात, 17 नोव्हेंबरला स्पष्ट होणार महायुतीचे चित्र !

The investigation is in its final stages, the picture of the Mahayuti will be clear on November 17th : मतभेद – मनभेद टाळण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना

Nagpur : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. महायुती शक्य नसलेल्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील. अशा ठिकाणी मतभेद आणि मनभेद निर्माण होऊ नयेत, याची खबरदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे निर्देश देण्यात आलेले आहेत. तरीही महायुतीचाच मार्ग योग्य असेल, असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

यासंदर्भात नागपुरात पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, रामटेकमधील काही पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र लढतीची मागणी केली आहे, त्यांनाही आवश्यक मार्गदर्शन दिलेले आहे. राज्यभरात महायुती बद्दल प्रचंड उत्साह आहे. ५१ टक्के मतांसह महायुती विजयी होईल, असा आम्हाला विश्वास आहे. तिकीट वाटप आणि स्थानिक निर्णयासाठी सर्वाधिकार जिल्हाध्यक्ष आणि कोर कमिटीला देण्यात आले आहेत.

Removal from spokesperson: अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी !

महायुती बाबतचे संपूर्ण चित्र १७ नोव्हेंबर पर्यंत स्पष्ट होईल. वाटाघाटी शेवटच्या दिवसापर्यंत सुरू राहणार आहेत. भाजपमध्ये शिस्त आहे आणि आमच्याकडे बंडखोरीची शक्यता अत्यंत कमी आहे. कार्यकर्त्यांना तिकीट मागण्याची पद्धत आणि योग्य वेळ माहिती आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे, हे आमचे ध्येय असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे सरकारच्या काळात २७ टक्के ओबीसी आरक्षण रद्द झाले होते. मात्र महायुती सरकारने सर्वोच्च न्यायालयात उच्चस्तरीय वकील नेमून हे आरक्षण पुन्हा मिळवले. राज्यातील अठरापगड जाती आणि साडेतीनशे मायक्रो ओबीसी गटांना प्रतिनिधित्वाची संधी मिळणार आहे. खरे ओबीसी, खोटे ओबीसी अशी भाषा करणे चुकीचे आहे, असा इशाराही बावनकुळे यांनी आरक्षणावर वाद निर्माण करणाऱ्यांना दिला.

Land scam in Pune’s Koregaon : मुंडवा जमीन व्यवहार रद्द करण्याची अमेडिया ची तयारी, पण…

संविधानिक संस्थांवर टीका करणे योग्य नाही. जिंकतात तेव्हा आयोग चांगला आणि हरले की आयोगावर आरोप करणे, ही प्रवृत्तीच मुळात चुकीची आहे, असे म्हणत माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर बावनकुळे यांनी प्रत्यूउत्तर दिले. बच्चू कडू यांनी विखे पाटील यांची गाडी फोडणाऱ्याला बक्षीस जाहीर केले. त्यावर महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे कुणी कुणाची गाडी अशीच फोडू शकत नाही, असे म्हणत बच्चू कडू यांना बावनकुळेंनी इशारा दिला.