Local Body Elections : नगरपरिषद, नगरपंचायती निवडणुकांचा बिगूल वाजला !

The trumpet of the municipal council and municipal panchayat elections has sounded : २ डिसेंबरला मतदान, ३ ला मतमोजणी

Nagpur : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल अखेर वाजला आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज (४ नोव्हेंबर) मुंबईत पत्रकार परिषदेत नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. यावेळी आयोगाचे सचिव सुरेश काकाणी उपस्थित होते.

या निवडणुका २ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या एकूण २८८ सदस्यपदांसाठी तसेच थेट अध्यक्षपदांसाठी मतदान होणार आहे. घोषणेच्या पार्श्र्वभूमीवर आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व राजकीय पक्ष आणि प्रशासनावर आचारसंहितेची बंधने येणार आहेत. निवडणुकीच्या तारखा घोषीत झाल्याबरोबर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

cabinet meeting : महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गंभीर आजारांवर उपचार

१० नोव्हेंबरपासून सुरूवात..
नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास १० नोव्हेंबरपासून सुरूवात होईल. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर २०२५ असेल. नामनिर्देशनपत्रांची छाननी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरूद्ध अपील नसलेल्या ठिकाणी २१ नोव्हेंबरपर्यंत, तर अपील असलेल्या ठिकाणी २५ नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. मतदान २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होईल. ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रापुरती आचारसंहिता संपुष्टात येईल.

Khamgao APMC : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ता संघर्ष तापला!

राज्यातील एकुण २४७ पैकी २४६ नगरपरिषदांसाठी ही निवडणूक होत आहे. निवडणूक होत असलेल्यांपैकी १० नवनिर्मित नगरपरिषदा आहेत. उर्वरित सर्व २३६ नगरपरिषदांची मुदत संपली आहे. न्यायालयीन प्रकरणांमुळे पातूर (जि.अकोला) नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया प्रलंबित आहे. त्याचबरोबर एकूण १४७ पैकी ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. निवडणूक होत असलेल्यांपैकी १५ नवनिर्मित, तर उर्वरित सर्व २७ नगरपंचायतींची मुदत यापूर्वीच संपलेली आहे. १०५ नगरपंचायतींची मुदत अद्याप संपलेली नाही. निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्याही प्रतिनिधींशी संवाद साधण्यात आला आहे, असे वाघमारे यांनी सांगितले.