Unease in BJP after Navneet Rana’s announcement : नवनीत राणांच्या घोषणेनंतर भाजपमध्ये अस्वस्थता, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
Amravati स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या तरीही युती-आघाडीचे प्रश्न सुटत नाहीयेत. स्वबळावर लढायचे की एकत्र लढायचे, याबाबत निर्णय होत नसल्याने कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. अमरावतीमध्ये देखील भाजप आणि स्वाभिमानी पक्षातील तिढा कायम असल्याने उत्सुकता ताणली गेली आहे.
महापालिका निवडणुकीत भाजप आणि युवा स्वाभिमान पक्ष यांची युती होणार असल्याची घोषणा माजी खासदार नवनीत राणा यांनी केली. ही घोषणा युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांसाठी दिलासादायक असली, तरी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
Monsoon session : ऐतिहासिक विश्रामगृह पाडल्याचा वाद विधीमंडळात
काल-परवा संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, “विधानसभा निवडणुकीत भाजप-स्वाभिमान युतीमुळे भूतो न भविष्यती असा विजय मिळाला. महापालिका निवडणुकीतही आपण सर्वजण एकत्र लढणार असून महापालिकेवर भगवा झेंडा फडकवणार.”
या कार्यक्रमाला भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण तायडे, शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे व जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख हे मान्यवरही उपस्थित होते. मात्र, केवळ तीन महिन्यांपूर्वी नवनीत राणा यांनी “भाजप महापालिका निवडणूक स्वबळावर लढवेल; कोणत्याही पक्षाशी युती होणार नाही,” असे जाहीर वक्तव्य केले होते.
Uddhav Balasaheb Thackeray : बुलढाण्यात ठाकरे गटाला ‘अच्छे दिन’?
त्यावेळी राजापेठ येथील भाजप कार्यालयात आयोजित शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या पदग्रहण समारंभात त्यांनी हे वक्तव्य करून कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले होते. त्यामुळे आता त्यांनी घेतलेला युतीचा कल कार्यकर्त्यांना खटकतो आहे.
त्याच कार्यक्रमात युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक व आमदार रवी राणा यांनीही तितक्याच ठसक्याने आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “नवनीत राणा भाजपच्या पॉवरफुल नेत्या असल्या तरी आम्हीही कमी नाही. प्रत्येकाने एकमेकांचे अस्तित्व मान्य करायला हवे. भाजप हा मोठा पक्ष असून युवा स्वाभिमान पक्ष त्याचा लहान भाऊ म्हणून काम करतो. युती राहील आणि महापौर भाजपचाच होईल.”
२०१७ च्या निवडणुकीत भाजपला ४५ जागा, तर स्वाभिमान पक्षाला ३ जागा मिळाल्या होत्या. मात्र, आजची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. राज्यात भाजप-शिंदे गट-अजित पवार गट यांची युती आहे. या युतीचा महापालिका निवडणुकीतही ठसा राहणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
त्यातच युवा स्वाभिमान पक्षानेही जागा मागणी केली असून वाटेकरी वाढल्यास भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी मिळेल का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक मानली जाते. त्यामुळेच प्रामाणिक, वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी, ही भाजप कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.