Local Body Elections : जिल्हा परिषद निवडणुकीची प्रभाग रचना निर्णायक टप्प्यात; नव्या राजकीय समीकरणांची शक्यता

Ward formation for Zilla Parishad elections in final stage : जिल्हाभरातून ४९ आक्षेप; ३१ जुलैपर्यंत हाेणार आलेल्या हरकतींवर सुनावणी

Buldhana जिल्हा परिषद गट व गणांच्या प्रारूप रचनेवर अंतिम निर्णयाचा चेंडू आता विभागीय आयुक्तांच्या कोर्टात आहे. २९ ते ३१ जुलैदरम्यान ४९ आक्षेपांवर सुनावणी होणार असून, त्यानंतर कोणते बदल होतात याकडे संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय इच्छुक, गटप्रमुख, पक्षनेते आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. संभाव्य फेररचनेमुळे अनेकांच्या उमेदवारीच्या गणितांवर पाणी फिरण्याची भीती व्यक्त होत आहे.

२०१६-१७ च्या तुलनेत यंदा एक गट व दोन गणांची वाढ झाली असली, तरी अनेक गावांचे सीमांकन बदलल्याने राजकीय नेतृत्वासाठी ‘सेफ झोन’ मानले जाणारे मतदारसंघ बदलले गेले आहेत. यामुळे अनेक इच्छुकांच्या मतदारसंघाचे स्वरूपच पालटल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी राजकीय प्रतिस्पर्धी एकाच गटात येण्याची शक्यता निर्माण झाल्याने संघर्ष उभा राहत आहे. परिणामी इच्छुकांमध्ये अस्वस्थता असून, अंतिम आराखड्यात कोणते बदल होतील, याकडे राजकीय गोटाचे लक्ष लागले आहे.

Protest in Malkapur : मलकापूरात ‘समतेचे निळे वादळ’ संघटनेची जोरदार निदर्शने

२१ जुलैपर्यंत आक्षेप मागविल्यानंतर २२ ते २६ जुलैदरम्यान काही हरकती मान्य करून आंशिक फेरबदल करण्यात आले होते. मात्र आता अंतिम निर्णय विभागीय आयुक्तच घेणार असून, यानंतरच निवडणूक आयोग पुढील प्रक्रिया सुरू करेल. त्यामुळे राजकीय पक्ष आणि इच्छुक नेत्यांनी नव्याने मांडणीसाठी हालचाली गतीमान केल्या आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचाही प्रारूप आराखडा राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. प्रभागांत अपेक्षित बदलांमुळे नगरपालिकांतीलही अनेक दिग्गजांची गणितं कोलमडण्याची शक्यता आहे. आराखड्यावर निर्णय होऊन तो निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर अंतिम रचना ठरेल. ‘ब’ व ‘क’ वर्गाच्या नगरपालिकांमध्ये सदस्यसंख्या, आरक्षण आणि प्रभाग मर्यादा निश्चित होताच स्थानिक राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हं आहेत.

Kirit Somaiya : वर्षभरात १० लाख रोहिंग्यांना बनावट जन्म प्रमाणपत्र?

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी २००० ईव्हीएम यंत्रांची तपासणी पूर्ण झाली असून, काही यंत्रणा दुरुस्तीसाठी पाठवण्यात आली आहे. २०१६-१७ मध्ये सुमारे १७५० मतदान केंद्रे होती, मात्र यंदा मतदारसंख्या वाढल्याने ही संख्या २००० पार जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे अधिकाधिक केंद्रांवर नियंत्रण व नियोजनाच्या दृष्टीने प्रशासन सज्ज झाले आहे.