Ward structure finalised; two objections accepted, 16 rejected : जिल्ह्यात ५९ गट, ११८ गण कायम; जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवले
Amravati जिल्हा परिषदेचे ५९ गट आणि पंचायत समितीचे ११८ गण यांची प्रभाग रचना विभागीय आयुक्तांनी अंतिम केली असून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहे. या प्रभाग रचनेवर एकूण १८ आक्षेप दाखल झाले होते. त्यापैकी २ आक्षेप स्वीकारले, तर १६ आक्षेप फेटाळण्यात आले, अशी माहिती आहे.
चिखलदरा आणि चांदूर रेल्वे तालुक्यात प्रत्येकी चार, भातकुली, तिवसा, मोर्शी आणि अचलपूर तालुक्यात प्रत्येकी दोन, तर धारणी आणि दर्यापूर तालुक्यात प्रत्येकी एक आक्षेप नोंदविला गेला होता.
या आक्षेपांवरील शिफारशींसह प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे सादर केला. त्यानंतर ६ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी झाली. सुधारित प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी १८ ऑगस्टपूर्वी विभागीय आयुक्तांकडे पाठविला. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्तांनी अंतिम मान्यता देऊन प्रस्ताव जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे सुपूर्द केला. जिल्हाधिकाऱ्यांनी या अंतिम प्रभाग रचनेला प्रसिद्धी दिली आहे.
Sajid Khan Pathan : कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना आमदारांचा सज्जड दम
आता या रचनेवर विभागीय आयुक्त किंवा निवडणूक आयोगाकडे अपील करण्याची तरतूद नाही. त्यामुळे फेटाळलेल्या आक्षेपांपैकी काही अर्जदारांकडून न्यायालयात दाद मागितली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Marbat 2025 : महागाई, भ्रष्टाचारावर प्रहार; डोनाल्ड ट्रम्पचाही बडगा !
अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी गटातील हनुवतखेडा हे गाव नव्या बदलानुसार धोतरखेडा गटात समाविष्ट करण्यात आले. तसेच धोतरखेडा गटातील दर्याबाद गट ग्रामपंचायत आणि चांदूर जहाे ही दोन गावे आता धामणगाव गढी गटात आली आहेत. चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ गटातील आमझरी गाव हे बदलानुसार सलोना गटात समाविष्ट करण्यात आले आहे. गावाजवळचे अंतर हा आक्षेप विभागीय आयुक्तांनी मान्य केला, तसेच लोकसंख्येच्या निकषानुसार हा बदल करण्यात आला, अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.








