Warning of Boycott of Municipal Council Elections : खालिद बिन वलीद व बालाजीनगरवासीयांचा संताप; नगर परिषद निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा
Buldhana शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील खालिद बिन वलीद नगर आणि बालाजी नगर येथील नागरिकांनी नगर परिषदेकडून मूलभूत सुविधा न मिळाल्याच्या निषेधार्थ आगामी नगर परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी बुलढाणा यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.
सदर भागात गेल्या अनेक वर्षांपासून लोक वास्तव्यास असूनही रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट व पाणीपुरवठा या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. जुना खडकी मार्ग दुरुस्त न झाल्याने रस्त्यावर खोल खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे शाळकरी मुलांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. तसेच आरटीओ ऑफिसच्या मागील रस्त्यावर सांडपाण्यासाठी खोदलेला मोठा खड्डा अपघाताला आमंत्रण देत असून, नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
NCP Politics : मी मंत्री झालो तर गडचिरोलीचा विकास वेगाने होणार !
स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही नगर परिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. स्ट्रीट लाईट बंद असल्याने रात्री परिसर अंधारमय असतो, तर नाल्यांची व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहते, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
Harshawardhan Sapkal : ‘गली गली मे शोर है – चुनाव आयोग चोर है’
या सर्व समस्यांकडे तात्काळ लक्ष देऊन आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून न दिल्यास, नगर परिषद निवडणुकीचा बहिष्कार करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटीत दिला.








