Whose name for the post of Zilha Parishad chairman in the envelope from Nagpur? : शुक्रवारी होणार उघड; जिल्हा पपरिषद अध्यक्षाची निवडणूक
Gondia जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापतिपदासाठी शुक्रवारी (दि.२४) निवडणूक होणार आहे. अध्यक्षाचे नाव निश्चित करण्यासाठी मंगळवारी (दि.२१) मंगळवारी भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदी कोण यासाठी नावे निश्चित करून तो लिफाफा भाजपच्या नागपूर येथील वरिष्ठ नेत्यांकडे पाठविण्यात आला. आता त्यांच्याकडून एक नाव निश्चित करून हा लिफाफा शुक्रवारी सकाळी परत येणार आहे.
विद्यमान जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ नोव्हेंबर महिन्यात पूर्ण झाला. त्यामुळे पुढील अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड करण्यासाठी शुक्रवारी निवडणूक होणार आहे. जि. प. मध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्ता आहे. अध्यक्ष भाजपचा, तर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. तर पुढील अडीच वर्षांसाठी सुद्धा हेच सूत्र कायम राहणार आहे.
Sudhir Mungantiwar : अयोध्येतील राम मंदिराची वर्षपूर्ती ; चंद्रपूरवासियांना आठवले मुनगंटीवार !
भाजपकडून जि. प. अध्यक्षपद व सभापतिपदासाठी नाव निश्चित करण्यासाठी मंगळवारी वरिष्ठ नेते, पदाधिकारी, सदस्य यांची बैठक पार पडली. या बैठकीत चर्चा करुन प्राधान्य क्रमानुसार तीन नावे लिफाफ्यात बंद करून नागपूर
येथे वरिष्ठांकडे पाठविण्यात आली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते पाठविलेल्या तीन नावापैकी एक नाव निश्चित करून ते नाव शुक्रवारी लिफाफा बंद करून तो जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडे पाठविणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठीची नावे आता लिफाफा बंद झाली आहे.
जि. प.मध्ये पुढील अडीच वर्षांसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती कायम राहणार आहे. पण अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषयी समिती सभापतिपदावर नवीन सदस्यांना संधी देण्यात येणार आहे. पण विद्यमान दोन पदाधिकाऱ्यांनी पुन्हा वर्णी लागावी यासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापतिपदासाठी नावे निश्चित करण्यात जिल्ह्यातील चारही आमदारांची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यांचे मत जाणून घेऊन त्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. निवडणूक निरीक्षक म्हणून भाजपकडून नागपूर येथील माजी आमदार गिरीश व्यास यांची नियुक्ती केली आहे. ते बुधवारी गोंदिया येथे येणार आहेत. जि. प. सदस्य, पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांसह चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
किसमे कितना है दम
भाजप : २७, काँग्रेस : ११, राष्ट्रवादी काँग्रेस : ०८, चावी :०५, अपक्ष : ०२.