Breaking

Local Body Elections : दिवाळीपूर्वीच फुटणार झेडपीचे राजकीय फटाके!

Workers’ eagerness for Zilla Parishad elections is high : ५९ गट, ११८ गणांमध्ये निवडणुकीची हालचाल; कार्यकर्ते ॲक्टिव्ह मोडवर

Amravati तब्बल तीन वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ५९ गट व ११८ गणांच्या जुन्याच रचनेनुसार या निवडणुका घेण्यात येतील, अशी शक्यता आहे. यासाठी लवकरच आरक्षण सोडतीची प्रक्रियाही राबविली जाणार आहे.

दरम्यान, राज्यात सत्तांतरानंतर राजकीय समीकरणेही बदलली आहेत. यामुळे आगामी निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता आहे. मात्र पावसाळ्यात निवडणुका लांबणीवर जातील की दिवाळीपूर्वीच राजकीय फटाके फुटतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Bacchu Kadu : गुरुजी म्हणाले तर विधान परिषदेच्या रिंगणात उतरणार

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात जिल्ह्यात ६६ गट व १३२ गणांची नवी रचना करण्यात आली होती, मात्र या नव्या रचनेवर न्यायालयीन लढाई सुरू झाल्यामुळे निवडणुका रखडल्या. २१ मार्च २०२२ रोजी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासकीय कामकाज मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले.

न्यायालयाच्या आदेशानंतर गती

६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला चार आठवड्यांत गट, गण व प्रभागांची रचना व आरक्षण प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, सप्टेंबरपर्यंत निवडणुका घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे निवडणुकांची शक्यता प्रबळ झाली असून, कार्यकर्ते पुन्हा ॲक्टिव्ह झाले आहेत.

Akola MIDC : दलालांंमुळे औद्योगिक विकासात अडथळा!

सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. आता निवडणूक आयोग कधी निवडणुका जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. विशेष म्हणजे यात सरकारचीही भूमिका महत्त्वाची असणार आहे.