Breaking

Local Body Elections : विधानसभेतील अंतिम मतदार यादीच ‘फायनल’!

Zilla Parishad and Panchayat Samiti elections likely to be held in the first phase : पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांची शक्यता

Nagpur विधानसभा निवडणुकीनंतर मतदार यादी व मतदानाच्या आकड्यांवर काँग्रेससह काही पक्षांनी आक्षेप घेतला होता. लोकसभा निवडणुकीच्या काळातील मतदार संख्या व विधानसभा निवडणुकीतील मतदार संख्या यात मोठी तफावत होती. यावर काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला असून यात मोठा घोळ असल्याचा आरोपही करण्यात आला. पण पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये विधानसभेतील मतदार यादीच अंतिम मानली जाणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.

पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या निवडणुकांमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीतील अंतिम मतदार यादी ग्राह्य धरली जाणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भातील प्रस्ताव देखील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला आहे.

Vidarbha Farmers : ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे शेताचा झाला तलाव!

शासनाने महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सर्कल रचना तयार करण्याचे आदेश दिले आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सर्कल रचना तयार होणार असून आरक्षणही निश्चित होणार आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समित्या, तर हिवाळी अधिवेशनानंतर महानगरपालिका व नगरपालिकांच्या निवडणुका होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Buldhana Administration : सोयीसुविधांची वानवा, प्रशासनाला ‘दंडवत’!

ओबीसी आरक्षणामुळे महापालिका, नगरपालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका गेल्या तीन-चार वर्षांपासून झाल्या नाहीत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य शासन या निवडणुका घेण्याच्या तयारीला लागले आहे. या निवडणुकीसाठी मतदार यादी ग्राह्य धरण्यावरून आयोग मंथन करीत आहे. येत्या काही दिवसांत मतदार यादी दुरुस्तीसोबत मतदार यादी नोंदणीचा कार्यक्रम आयोगाकडून देण्यात येईल. या कार्यक्रमाच्या वेळीच मतदार यादीबाबत स्पष्ट सूचना देण्यात येतील.