Local Body Elections : ग्रामविकास मंत्र्यांना भेटणार जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य असोसिएशन!

ZP-PS members’ association to meet Rural Development Minister : आरक्षण पद्धतीत बदल; आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार

Akola जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांसाठी आरक्षण पद्धतीत बदल करण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने २० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली. नवीन नियमानुसार जिल्हा परिषदेच्या गटांसाठी आणि पंचायत समित्यांच्या गणांसाठी आरक्षण लोकसंख्येच्या आधारे ठरविले जाणार आहे. यापूर्वीची चक्रानुक्रम पद्धत रद्द करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर आरक्षण पद्धतीतील बदलाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य असोसिएशनची राज्य कार्यकारिणी लवकरच ग्रामविकास मंत्र्यांची भेट घेणार असून, चर्चा करणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलास गोरे-पाटील यांनी गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी दिली.

Wet drought : निकष आडवे आले, शेतकऱ्यांची आशा मोडली, सिंदखेडराजात ओला दुष्काळ जाहीर होणार नाही?

आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि महिला प्रवर्गासाठी राखीव जागांची संख्या निश्चित केली जाणार आहे. अनुसूचित जाती-जमातींसाठी आरक्षण लोकसंख्येच्या आधारावर तर महिला आणि इतर प्रवर्गांसाठी आरक्षण सोडतीद्वारे ठरवले जाईल.

गोरे-पाटील म्हणाले, “पूर्वी जिल्हा परिषदांचे जे गट आणि पंचायत समित्यांचे जे गण आरक्षित होते, त्यांना वगळून उर्वरित गट-गणांसाठी आरक्षण ठरवण्याची प्रथा होती. मात्र नवीन पद्धतीनुसार लोकसंख्येच्या आधारे आरक्षण होणार असल्याने यापूर्वी आरक्षित असलेले गट-गण पुन्हा आरक्षित होण्याची शक्यता आहे.”

Navneet Rana : गणेशोत्सव काळात आंदोलन नको; नवनीत राणांची मनोज जरांगे यांना विनंती

“राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये जसे प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले होते, त्याच पद्धतीने आगामी निवडणुकांसाठी आरक्षण निश्चित करावे,” अशी मागणी ग्रामविकास मंत्र्यांकडे करण्यात येणार असल्याचे गोरे-पाटील यांनी स्पष्ट केले.