Draw for Nagpur Zilla Parishad and Panchayat Samiti Elections to Be Held Today : १३ पंचायत समितींमधील गणांची आरक्षण सोडत तालुका मुख्यालयी
Nagpur : नागपूर जिल्हा परिषद व जिल्ह्यातील १३ पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषद सदस्यांची आरक्षण सोडत आणि पंचायत समितींमधील गणांच्या सदस्यांची सोडत आज (१३ ऑक्टोबर) होणार आहे. या सोडतीसाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून इच्छुकांचे लक्ष या सोडतीकडे लागले होते. आज सोडत निघाल्यानंतर उद्यापासून निवडणुकींच्या तयारीली वेग येणार आहे.
नागपूर जिल्हा परिषद विभागाच्या सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तर नागपूर जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या एकूण १३ पंचायत समितींमधील निर्वाचक गणांच्या सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दुपारी १ वाजता त्या-त्या तालुक्याच्या मुख्यालयी सभागृहात होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे.
Collector Office : अवैध धंद्यांच्या आहारी गेलेल्या लोकांना सावरण्यासाठी जिल्हाधिकारी सरसावले !
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. इच्छुकांनी उमेदवारीसाठी गळ टाकायला सुरूवात केली आहे. तयारीमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर दिसतो आहे. तर इतर राजकीय पक्ष अजूनही युती-आघाडी यामध्येच अडकलेले दिसत आहेत. नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये फार कमी ठिकाणी युती होण्याची चिन्हे दिसत आहेत. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, असे नेत्यांकडून सांगण्यात येत असले तरी नागपूर जिल्ह्यात घमासान होणार, असेच चित्र सध्यातरी दिसत आहे.








