Local Body Elections : जिल्हा परिषदेच्या गटांचा अंतिम आराखडा पाच दिवसांत?

Hearing of 49 objections to the draft design completed : प्रारुप रचनेवरील ४९ हरकतींची सुनावणी पूर्ण, इच्छुकांची वाढली धाकधूक

Buldhana माेठ्या अवधीनंतर हाेत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रारुप आराखड्यावर ४९ हरकती आल्या हाेत्या.त्यावर विभागीय आयुक्तांकडे सुनावणी झाली असून काही हरकती स्विकारण्यात आल्याने या प्रारुप आराखड्यात काही बदल हाेणार आहे. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचा आराखडा २२ ऑगस्ट राेजी अंतिम हाेण्याची शक्यता आहे. त्याकडे आता इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

प्रारूप आराखड्यावर जिल्हाभरातून आलेल्या ४९ आक्षेपांची विभागीय आयुक्तांनी सुनावणी पूर्ण केली आहे. या आक्षेपांनुसार काही किरकोळ बदल होत असून, सुधारीत आराखडा १८ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्तांच्या कोर्टात पुन्हा अवलोकनासाठी जाणार आहे. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी गट-गणांचा आराखडा अंतिम होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. आक्षेप कायम राहिल्यास आता न्यायालयीन लढाईच शिल्लक आहे.

Court action ; 10 हजार रुपये वसूल करण्याचे आदेश !

बुलढाणा जिल्हा परिषदेत गतवेळेपेक्षा एक गट व दोन गणांची वाढ झाली असून, आता गटांची संख्या ६१ तर गण १२२ झाली आहे. या बदलामुळे अनेक राजकारण्यांचे गणित बदलले असून, याच कारणास्तव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर आक्षेप दाखल झाले होते. मात्र उच्चपदस्थ सूत्रांच्या माहितीनुसार, प्रारूप आराखड्यात मोठे बदल होण्याची शक्यता नाही.

Local body elections ! युती झाली किंवा नाही झाली तरी 100 पार !

जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नसले तरी त्याकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. ग्रामविकास विभागाने लोकसंख्येचा ताजा डेटा मागवला असून, २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात ग्रामीण लोकसंख्या २०,२४,४११ आहे. अनुसूचित जाती १९.६४ टक्के तर अनुसूचित जमाती ५.७२ टक्के आहे. या आधारेच आरक्षणाचा निर्णय होणार आहे.जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठीची आरक्षण सोडत मुंबईत होणार असून, पंचायत समिती सभापतींसाठीची सोडत जिल्ह्यातच होईल. या निर्णयांवर अनेक नेत्यांचे राजकीय भविष्य अवलंबून असल्याने सध्या जिल्ह्यात चर्चा तापल्या आहेत.