Local Body Elections : मेहकर नगरपरिषद मतदार यादीत मृतांची नावे कायम!

Names of Deceased Persons Still Remain in the Voter List : विवाहित महिलांची नावेही वगळली नाही, चौकशीसाठी तहसीलदारांची विशेष बैठक

Mehkar आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेहकर शहरातील मतदार याद्यांचे पुनर्परीक्षण सुरू असताना गंभीर अनियमितता उघडकीस आली आहे. वॉर्ड क्रमांक १५ मधील मतदार यादीत मृत व्यक्तींची नावे कायम असल्याचे, तसेच विवाहित महिलांची नावे वगळली नसल्याचे समोर आले असून, नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

मेहकर येथील गजानन नामदेव चांगाडे हे आपल्या विवाहित मुलीचे नाव मतदार यादीतून वगळण्यासाठी नगरपरिषदेच्या कार्यालयात गेले असता, त्यांनी पाहिले की यादीत केवळ काहीच नव्हे तर तब्बल ४२ मृत व्यक्तींची नावे अद्याप कायम आहेत. या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेवरील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Eknath Shinde Shivsena : शिंदेसेना यंदा ‘घाटाखाली’ जोर मारणार का?

चांगाडे यांनी या संदर्भात नगरपरिषद, तहसीलदार, राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना लेखी निवेदन देत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे.

या तक्रारीनंतर मेहकरचे तहसीलदार निलेश मडके यांनी वॉर्ड क्रमांक १५ मधील मतदार यादीतील अनियमिततेबाबत २७ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात विशेष बैठक बोलावली आहे. या बैठकीत संबंधित अधिकारी आणि बीएलओंवर चौकशी होणार असून, दोषी आढळल्यास कारवाई प्रस्तावित केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Prataprao Jadhav : इच्छुक उमेदवारांची बैठक, नेते म्हणाले, ‘कामाला लागा’!

दरम्यान, काही नागरिक गेल्या दहा-बारा वर्षांपूर्वी बाहेरगावी स्थायिक झाले किंवा निधन झाले असतानाही त्यांची नावे मतदार यादीत कायम असल्याने, प्रशासनाच्या दक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विवाहित महिलांची नावे त्यांच्या पतीच्या गावात समाविष्ट झाल्यानंतरही मेहकर मतदार यादीत दिसत असल्याने मतदार यादीतील अचूकतेबाबत शंका व्यक्त केली जात आहे. या सर्व घडामोडींमुळे नगरपरिषद निवडणुकीपूर्वी प्रशासनावर मतदार यादीतील त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याचा दबाव वाढला आहे.