Local Body Elections : पटोलेंची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून गच्छंती ?

 

Nana Patole’s removal from the post of Congress state president soon : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या अध्यक्षाच्या नेतृत्वात

Nagpur स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी भाजप व महायुतीकडून तयारी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने मात्र नेतृत्वबदलाची तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊनच काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना नारळ देण्यात येण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात दणक्यात कामगिरी केली होती. यामध्ये काँग्रेसने तर जोरदार कमबॅक केले. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वजन महाराष्ट्रात वाढले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेससह संपूर्ण महाविकास आघाडी धाडकन कोसळली. पण काँग्रेसच्या अपयशाचे खापर पटोलेंवर फोडण्यात आले. विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर पटोले यांनी स्वत: राजिनामा देण्याची तयारी दर्शविली होते, हे विशेष.

 

Farmers will get electricity during the day : ८३० शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज!

 

लोकसभा निवडणूकीत पटोले यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसला चांगले यश मिळाले होते. मात्र त्यांच्याविरोधात पक्षात कुरबुरी होत्या व अनेक नेत्यांच्या अजूनही तक्रारी कायम आहेत. विधानसभेच्या प्रचारादरम्यान पटोले यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठीदेखील समोर आले होते. मात्र निकालांनी पटोलेंच्या स्वप्नांना सुरुंग लावला.

Nagpur Police : फायनान्सवर वस्तू घेतली, २२ लाखांनी लुटले !

काँग्रेसला राज्यात केवळ १६ जागांवर विजय मिळविता आला. पटोले यांची जागादेखील पोस्टल बॅलेट्समुळे वाचली. अनेक दिग्गज नेतेमंडळींचा या निवडणुकीत पराभव झाला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र, त्यावेळी त्यांना हायकमांडने थांबण्यास सांगितले.

मात्र भाजप व महायुतीकडून ज्यापद्धतीने आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे, ते पाहून कॉंग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. पटोले यांच्या अनेक तक्रारी हायकमांडकडे गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपदाची धुरा काढण्यात येण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे ही जबाबदारी येण्याची शक्यता आहे.