October 13 set as the date for ward reservation lottery : प्रतीक्षा संपली; ३० गटांमध्ये महिलांचे वर्चस्व
Amravati जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांतील गण-गटांच्या आरक्षणाबाबतची प्रतीक्षा अखेर संपली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १३ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरावर गटांची तर पंचायत समिती स्तरावर गणांची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
यापूर्वी ग्रामविकास विभागाने १२ जून रोजी काढलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे ५९ गट आणि पंचायत समित्यांचे ११८ गण निश्चित करण्यात आले आहेत. त्यानंतर २२ ऑगस्टला या सर्व गण-गटांची प्रभागरचना अंतिम करण्यात आली. मतदार यादीचाही कार्यक्रम जाहीर झाला असून सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी केवळ आरक्षण सोडती प्रलंबित होती. त्यामुळे राजकीय गोटात मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.
Crop productiuon estimate paisewari : अकोला, वाशिमला न्याय; अमरावती, यवतमाळ, बुलढाण्यावर अन्याय?
जिल्ह्यातील आरक्षणाचे चित्र
सन २०११ च्या जनगणनेनुसार आणि आयोगाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील ५९ गटांपैकी :
अनुसूचित जातींसाठी ११ (यामध्ये ६ महिला)
अनुसूचित जमातींसाठी १२ (यामध्ये ६ महिला)
नामनिर्देशित प्रवर्गासाठी १६ (यामध्ये ८ महिला)
सर्वसाधारण प्रवर्गासाठी २० (यामध्ये १० महिला)
अशा प्रकारे एकूण ३० गटांमध्ये महिला उमेदवारांचे वर्चस्व राहणार आहे.
Shops to remain open for 24 Hours : चोवीस तास व्यापार, दुपटीने वाढेल रोजगार
सोडतीचा कार्यक्रम
१० ऑक्टोबर : आरक्षण सोडतीची सूचना प्रसिद्ध
१३ ऑक्टोबर : जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद गटांची, तर तहसीलदारांच्या उपस्थितीत पंचायत समिती गणांची सोडत
१४ ते १७ ऑक्टोबर : आक्षेप नोंदविण्याची मुदत
२७ ऑक्टोबर : आक्षेप व अभिप्रायासह अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर
३१ ऑक्टोबर : आरक्षण अंतिम जाहीर