Local Body Elections : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जुनाच फाॅर्म्युला

Old formula for Zilla Parishad elections : ६६ नव्हे तर ५९ गट राहणार कायम? लोकसंख्येचा डेटा रवाना

Amravati स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे वारे आता वाहू लागले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना, गट आणि गणाचे प्रारूप तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. २०२२ मध्ये केलेली गट आणि गण रचना रद्द होणार आहे. त्याऐवजी २०१७ मध्ये ज्या सदस्य संख्येवर आधारित रचना केली होती. त्यावरच आता पुन्हा गण गट रचना होणार असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका या मागील ३ वर्षांपासून झालेल्या नाहीत. दरम्यानच्या काही बदलही झाले आहेत. त्यामुळे ग्रामविकास विभागाने जिल्हा प्रशासनाकडे लोकसंख्येची माहिती मागविली होती. त्यानुसार विहित परिशिष्टामध्ये भरून प्रमाणित करून पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट, गणात बदल केला होता.

Nilesh vs Nitesh Rane: राणे बंधूमध्ये शाब्दिक रण, ‘तुम्ही टॅक्स फ्री आहात’ म्हणताच ‘ती’ पोस्ट केली ‘डिलीट’

मात्र, सरकार बदलल्यानंतर ही वाढलेली गट, गणांची संख्याही बारगळली होती. परिणामी आगामी झेडपी, पं. स.च्या निवडणुका या जुन्याच फॉर्म्युलानुसार होण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय ५९ गट कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात असली तर या गट, गणाचे आरक्षण मात्र बदलणार आहे.

२०२२ च्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि गट गण रचना केली होती. त्यात २०११ च्या जनगणनेत १० टक्के वाढ झाली असे गृहीत धरून त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या निश्चित केली होती. जिल्हा परिषदांसाठी पूर्वी किमान ५० आणि कमाल ७५ सदस्य असे सूत्र होते. २०२२ मध्ये ते सूत्र बदलून किमान ५५ आणि कमाल ८० असे करण्यात आले होते.

Split in Shinde Sena : दोन दिवसांत दुसरी बैठक, शिंदे गट अस्वस्थ

त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषदेत सदस्यांची संख्या वाढली होती. त्यानुसार अमरावती जिल्हा परिषदेत ७ सदस्य वाढविण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनाकडून ६६ गटांची रचना करण्यात आली होती, मात्र त्याआधारे निवडणुका झाल्या नाहीत.