Local Body Elections : राजकीय अस्थैर्याचे निवडणुकीवर सावट!

Political instability casts shadow over elections : बंडखोरी, संघर्ष आणि हिंसक घटना वाढल्या

Amravati अमरावती जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या अंतर्गत संघर्ष, बंडखोरी आणि हिंसक घटनांमुळे तणावग्रस्त आहे. यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर या राजकीय अस्थिरतेचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

अमरावती जिल्ह्यात भारतीय जनता पक्षात (भाजप) अंतर्गत बंडखोरी तीव्र झाली आहे. विशेषत: अचलपूर येथे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरांनी स्वतंत्र उमेदवारी दाखल केली होती. तिवसा येथेही पक्षांतर्गत वाद उफाळले होते. बडनेरा मतदारसंघात तर उघड बंडखोरी झाली होती. याचा थेट परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे.

Local Body Elections : निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राजकीय संघर्ष वाढला

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये बहुकोनी लढती होण्याचे संकेत आहेत. भाजप, काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), प्रहार जनशक्ती पक्ष आणि अपक्ष उमेदवार यांच्यात तीव्र चुरस आहे. या बहुकोनी लढतींमुळे मतविभाजन होऊन निकाल अनपेक्षित लागण्याची शक्यता आहे.

MLA Ravi Rana : आमदारांच्या घरासमोर फासेपारधी समाजाचा ठिय्या

अमरावतीत नुकत्याच घडलेल्या हिंसक घटनांनी राजकीय वातावरण आणखी तापले आहे. शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. तसेच, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी काही संघटनांकडून शस्त्र वाटप होत असल्याचा गंभीर आरोप केला होता, ज्याला भाजप खासदार अनिल बोंडे यांनी प्रत्युत्तर दिले. या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आहे.

MLA Randhir Sawarkar : शेतमालाच्या किमतीत दुपटीहून अधिक वाढ

अमरावती विभागात २ महापालिका, ५ जिल्हा परिषद, ४० नगरपालिका, १६ नगर पंचायती, ५६ पंचायत समित्या आणि ३,९१० ग्रामपंचायतींच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, या निवडणुका पुढील चार महिन्यांत पूर्ण कराव्या लागणार आहेत. पक्षांतर्गत वाद, बंडखोरी आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा या निवडणुकांमध्ये निर्णायक ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०२२ पूर्वीची ओबीसी आरक्षणाची स्थिती कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण ढवळून निघू लागले आहे.