Local Body Elections : निवडणूक आचारसंहितेची धाकधूक, पालकमंत्र्यांची लगीनघाई!

The Guardian Minister called for proposals for development works : विकास कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे दिले निर्देश

Akola स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची धाकधूक असल्यामुळे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांची लगीनघाई सुरू झाली आहे. त्यांनी तातडीने आढावा बैठक घेतली आणि विकास कामांचे प्रस्ताव 15 सप्टेंबरपूर्वी सादर करण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना दिले.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हाती घेतलेल्या विकासकामांची प्रशासकीय मान्यता तातडीने पूर्ण करा. मान्यतांअभावी निधी अखर्चित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश राज्याचे कामगार मंत्री व अकोल्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी सर्वसाधारण योजनेतील कामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा मीना, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.

Vidarbha Farmers : रस्त्याचे काम दोन वर्षांपासून ठप्प, शेतकऱ्यांचे उपोषण

पालकमंत्री फुंडकर म्हणाले, “मंजूर निधीतून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात. त्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत प्रशासकीय मान्यतांची कार्यवाही पूर्ण करावी.”

बैठकीत महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य, महाऊर्जा, मृद व जलसंधारण, वैद्यकीय महाविद्यालय, क्रीडा, रोजगार व कौशल्य विकास आदी विभागांची कामे व मान्यतांची सद्यस्थिती तपासण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची घोषणा येत्या काही दिवसात होण्याची शक्यता गृहीत धरून तातडीने विकास कामांचे प्रस्ताव सादर करून ते मंजूर करण्याच्या दृष्टिकोनातून ही बैठक घेण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक साठी प्रभाग रचना अंतिम झाली असून आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ST announcement : एसटी महामंडळाची घोषणा, ७५ बसस्थानकांवर मोफत वाचनालय

नगरपालिका व नगरपंचायतीच्या प्रभाग रचनाही अंतिम टप्प्यात असून लवकरच आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यास विकास कामे आचारसंहितेच्या कचाट्यात अडकू शकतात अशी शक्यता असल्याने प्रशासकीय व राजकीय स्तरावर तातडीने हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे.