Two changes in the format of groups after objections : २२ ऑगस्टला अंतिम प्रभाग रचनेची प्रसिद्धी
Amravati जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर जिल्हाभरातून एकूण १८ आक्षेप व हरकती दाखल झाल्या होत्या. यापैकी चिखलदरा आणि अचलपूर तालुक्यातील प्रत्येकी एक आक्षेप मान्य झाल्याची चर्चा आहे. अंतिम प्रभाग रचनेला विभागीय आयुक्तांची मान्यता मिळाल्यानंतर २२ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रसिद्धी दिली जाणार आहे. त्यानंतरच सुधारित रचना आणि झालेले बदल स्पष्ट होतील.
जिल्हा परिषदेचे ५९ गट आणि त्याअंतर्गत पंचायत समितीचे ११८ गणांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर जिल्हाधिकाऱ्यांकडे १८ आक्षेप दाखल झाले होते. यामध्ये चिखलदरा आणि चांदूररेल्वे तालुक्यात प्रत्येकी चार, भातकुली, तिवसा, मोर्शी व अचलपूर तालुक्यात प्रत्येकी दोन, तर धारणी आणि दर्यापूर तालुक्यात प्रत्येकी एक आक्षेप होता. या अर्जांवर शिफारशींसह प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे सादर केला. त्यानंतर ६ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी झाली.
Chandrashekhar Bawankule : बावनकुळे म्हणाले, मला काँग्रेस नेत्यांची कीव येते
सुधारणेसह प्रभाग रचनेचा अंतिम प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून १८ ऑगस्टपर्यंत विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येईल. त्यावर मान्यता मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी अंतिम प्रभाग रचना २२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करणार आहेत.
Pawar Vs Padalkar : ‘रोहित पवार औरंगजेबाच्या वृत्तीचा’, पडळकरांचा पलटवार
प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या १८ आक्षेपांपैकी दोन आक्षेप मान्य झाल्याची चर्चा आहे. त्यामध्ये चिखलदरा तालुक्यातील एका गावाचे फेरा बदल तसेच अचलपूर तालुक्यात नव्याने तयार करण्यात आलेल्या धोतरखेडा गण-गटातील एका गावाचा बदल यांचा समावेश आहे. मात्र याबाबतची अधिकृत माहिती २२ ऑगस्टला अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतरच समोर येणार आहे.