Local Body Elections : आजी–माजी आमदारांना मतदारांचा समसमान कौल!

Voters give an equal verdict to former and current MLAs : मलकापूर–नांदुरात प्रतिष्ठेची लढत; प्रत्येकी एक नगरपरिषद ताब्यात

Malkapur नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये मलकापूर मतदारसंघातील आजी व माजी आमदारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र, निकालांनी कोणालाही एकहाती वर्चस्व न देता मतदारांनी आजी आणि माजी आमदारांना प्रत्येकी एक–एक नगर परिषद देत समतोल कौल दिल्याचे स्पष्ट झाले.

माजी आमदारांच्या होमग्राऊंडवर आजी आमदारांनी जोरदार धडक देत नगर परिषद ताब्यात घेतली, तर आजी आमदारांच्या बालेकिल्ल्यात माजी आमदारांनी काँग्रेसचा करिश्मा कायम राखत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यामुळे या निवडणुकीकडे ‘प्रतिष्ठेची बरोबरी’ म्हणून पाहिले जात आहे.

थेट जनतेतून नगराध्यक्ष व नगरसेवक निवडणुकीचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर झाले. मलकापूर नगर परिषदेत विद्यमान आमदार चैनसुख संचेती यांच्या होमग्राऊंडवर काँग्रेसने मोठा विजय मिळवला. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार मिलिंद डवले यांचा तब्बल १०,९८४ मतांनी पराभव झाला.

Local body elections : ईव्हीएमवर आधी राष्ट्रीय पक्ष, मग प्रादेशिक पक्ष आणि शेवटी अपक्ष;

नगरसेवक पदाच्या २७ जागांपैकी भाजपला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले, त्यामुळे शहरात भाजपला मोठा धक्का बसला आहे. या निकालामुळे माजी आमदार राजेश एकडे यांनी विद्यमान आमदार संचेती यांना राजकीय शह दिल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे, माजी आमदार राजेश एकडे यांच्या होमग्राऊंड असलेल्या नांदुरा नगर परिषदेत विद्यमान आमदार चैनसुख संचेती यांनी सर्व ताकद पणाला लावत भाजपचे वर्चस्व प्रस्थापित केले. नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या सौ. मंगलाताई सुधीर मुन्हेकर यांनी १२,०५० मते मिळवत विकास आघाडीच्या संतोषी महेश चांडक यांचा ४,२२३ मतांनी पराभव केला.

नगरसेवक पदाच्या २५ जागांपैकी ११ जागांवर भाजपने विजय मिळवत आकोट विकास आघाडीला मोठा धक्का दिला. त्यामुळे नांदुरात माजी आमदार एकडे यांच्या प्रभावाला छेद देण्यात भाजप यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे.

Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून 40 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता

या निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही एका नेत्याला पूर्ण वर्चस्व न देता आजी व माजी आमदारांना प्रत्येकी एक–एक नगर परिषद देत समसमान कौल दिला. यामुळे आगामी राजकीय समीकरणे अधिक रंजक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.