Warning to leave NDA ahead of local elections : जानकरांनी उगारली विरोधाची तलवार, सत्ताधाऱ्यांवर नाराजी
Akola “राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. योग्य वाटाघाटी झाल्यास आम्ही संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ)सोबत जाण्यास तयार आहोत,” असे स्पष्ट विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी आणि अन्य मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अकोल्यात पत्रकारांशी बोलताना जानकर म्हणाले, “राजकारणात कुठल्याही वेळेस नवे समीकरण तयार होऊ शकते. दोन वर्षांपूर्वी आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)सोबत होतो. आता ‘संपुआ’सोबत योग्य वाटाघाटी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरु आहे.”
Rashtriya Swayamsevak Sangh : संघ म्हणतो, ‘गांधींमुळे जगात भारताला मिळाली ओळख’
“सध्या कोणत्याही आघाडीला प्रस्ताव दिलेला नाही, तसेच कोणाकडून प्रस्तावही आलेला नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी राहुल गांधींना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केल्याची माहितीही त्यांनी दिली.
भाजपवर टीका करताना जानकर म्हणाले, “निवडणुकीपूर्वी जे आश्वासने दिली गेली, ती अद्याप पूर्ण झालेली नाहीत. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. तरुण बेरोजगार आहेत. आदिवासी आणि मागासवर्गीयांसाठीचा निधी इतरत्र वळवण्यात आला आहे. गरीबांच्या ताटातील अन्न काढून दुसऱ्यांना देण्यासारखे निर्णय हे चुकीचे आहेत.”
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे, दूध दर वाढवणे यासारख्या मागण्या पूर्ण व्हायला हव्यात. आता सरकार म्हणते शक्य नाही, तर मग ते बोललेच कशाला?” असा संतप्त सवाल जानकर यांनी उपस्थित केला.
Hindi is compulsory : हिंदीची सक्ती नाही, तर मग तसा आदेश का काढत नाही ?
राष्ट्रीय समाज पक्ष ३१ मेपासून गडचिरोली ते मुंबई दरम्यान ‘लॉन्ग मार्च’ काढणार आहे. “शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठीच हा लांब पल्ल्याचा मार्च असेल. सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासने पाळावीत, एवढीच आमची अपेक्षा आहे,” असेही जानकर यांनी स्पष्ट केले.