Decision likely to be taken in cabinet meeting : मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लागले लक्ष, निर्णय होण्याची दाट शक्यता
Dongao “आमची महादेवी हत्तीण परत द्या!” या घोषणांनी डोणगावचे रस्ते दुमदुमले होते. स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठ येथील महादेवी हत्तीण गुजरातमधील वनतारा येथे नेण्यात आल्याच्या निषेधार्थ डोणगाव येथील दिगंबर जैन समाजातर्फे शांततेत मूक मिरवणूक काढण्यात आली.
ही मिरवणूक डोणगाव शहरातून प्रभात फेरी मार्गे काढण्यात आली. मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने महिला, पुरुष, जैन बांधव सहभागी झाले होते. या मूक निषेध मिरवणुकीत “महादेवी हत्तीण परत द्या” हा एकच आवाज सर्वत्र ऐकायला मिळत होता.
Vidarbha Farmers : शेती उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल, मदतीची फक्त घोषणाच!
या मिरवणुकीत माजी मंत्री सुबोध सावजी, माजी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती सौ. सायली सावजी, डोणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच चरण आखाडे, काँग्रेस कमिटी अध्यक्ष विष्णू पळसकर, तसेच डोणगाव दिगंबर जैन समाज अध्यक्ष मधुकर बोराळकर आणि सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.
Samruddhi Mahamarg : निचऱ्याअभावी ‘समृद्धी’ लगतच्या शेतात पाणीच पाणी
नांदणी येथील स्वस्तिश्री जीनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील लाडकी महादेवी हत्तीण काही दिवसांपूर्वी पोलिस बंदोबस्तात गुजरातमधील वनतारा प्रकल्पात हलवण्यात आली. यामुळे डोणगाव आणि परिसरातील जैन समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. महादेवी हत्तीण ही धार्मिक, भावनिक श्रद्धेचा भाग असल्यामुळे तिचा ताबा पुन्हा मूळ मठाकडे द्यावा, अशी मागणी समाजातर्फे करण्यात आली आहे. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शांततेत मूक फेरी पार पडल्यानंतर प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले.